शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
6
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

स्टीव्ह स्मिथकडे आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व

By admin | Updated: December 16, 2014 01:24 IST

जखमी मायकेल क्लार्कच्या भविष्याबाबत शंका व्यक्त केली जात असताना स्टीव्ह स्मिथ याला उर्वरित मालिकेसाठी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार नेमण्यात आले आहे.

मेलबोर्न : जखमी मायकेल क्लार्कच्या भविष्याबाबत शंका व्यक्त केली जात असताना स्टीव्ह स्मिथ याला उर्वरित मालिकेसाठी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार नेमण्यात आले आहे. सीएने सोमवारी या आशयाची घोषणा केली. अ‍ॅडिलेड कसोटीत स्नायू ताणले गेल्याने बाहेर पडलेल्या क्लार्कऐवजी स्मिथकडे नेतृत्व सोपविण्यात आले. ब्रॅड हॅडिन उपकर्णधार असेल. सीएचे निवडकर्ते रॉड मार्श यांनी स्टीव्हला आंतरराष्ट्रीय कसोटी कर्णधारपद मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
मार्श पुढे म्हणाले, ‘निवडकर्ते स्मिथला पसंती दर्शवितात. त्याची कामगिरी, परिपक्वता आणि नेतृत्व क्षमता या कामात त्याच्यावर भरवसा दाखविता येतो. २५ वर्षांचा स्मिथ आॅस्ट्रेलियाचा सर्वांत युवा कर्णधार बनला. त्याआधी १९७९ साली किम ह्यूज हा २५ व्या वर्र्षी कसोटी संघाचा कर्णधार बनला होता. आॅस्ट्रेलियाचा तो ४५वा, तर एकंदरीत तिसरा युवा कर्णधार ठरला. स्मिथ याला याआधी स्थानिक क्रिकेट स्पर्धेत त्याने केवळ न्यू साऊथ वेल्सचे नेतृत्व केले आहे. तो भारताविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत नेतृत्व करेल. कर्णधारपदाच्या शर्यतीत स्मिथसोबत ३७ वर्षांचा ब्रॅड हॅडिन हा देखील दावेदार होता; पण अधिक वय असल्याने निवडकर्ऱ्यांनी त्याला उपकर्णधारपद बहाल केले.
अ‍ॅडिलेड सामना जिंकून आॅस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
या विजयात मोलाची भूमिका वठविणाऱ्या स्मिथने नेतृत्वाची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, ‘अन्य सहकारी आणि हॅडिनकडून सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. गेली १८ महिने माझ्यासाठी आणि संघासाठी अत्यंत कठीण होते. कर्णधारपदाचे स्वप्न मी नेहमीच पाहिले. आता ही संधी मिळाली आहे. अनुभवी आणि युवा लोकांचे नेतृत्व करताना मला त्रास जाणवणार नाही. मी स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वांसोबत खेळलो आहे. सध्याच्या संघातील अनुभवी खेळाडूंचे मला सहकार्य मिळेल, अशी आशा आहे.’ स्मिथने २०१० साली पाकविरुद्ध कसोटी पदार्पण केले. (वृत्तसंस्था)