शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा : मुंबईचे बिरु बिंद, प्रथमेश नाडकर, मृणाल झारेकर अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 9:36 PM

नागपूरच्या अनिल तूरकरने मुंबईच्या राहुल भारद्वाजचा ३-० असा पराभव केला व अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुंबई :  शिवशंकर उत्सव मंडळाने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशन व मुंबई जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने ५ वी राज्यस्तरीय पुरुष प्रेसिडेंट चषक बॉक्सिंग स्पर्धा गिरणगावात आयोजित केली आहे. या बॉक्सिंग स्पर्धेत आज उपांत्य फेरीचे सामने पार पडले. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ४९ किलो वजनी गटात नाशिकच्या गोपाळ खंदारेने लातूरच्या अरविंद सावंतचा व नागपूरच्या अनिल तूरकरने मुंबईच्या राहुल भारद्वाजचा ३-० असा पराभव केला व अंतिम फेरीत प्रवेश केला.

५२ किलो वजनी गटात पुण्याच्या गौरव गोसावीने कोल्हापूरच्या अनिकेत पोवरचा तर अमरावतीच्या वैभव शिंदेने नागपूरच्या नितेश पटलेचा (३-०) पराभव केला व अंतिम फेरीत प्रवेश केला. ५६ किलो वजनी गटात मुंबईच्या बिरु बिंदने पुण्याच्या आशीष रसाळचा तर कोल्हापूरच्या शुभम पवार अमरावतीच्या अजर अलीचा  पराभव केला व अंतिम फेरीत प्रवेश केला.

६० किलो वजनी गटात  पुण्याच्या आकाश मानेरेने नाशिकच्या श्रीहरी मोरेचा व अमरावतीच्या रीतीक तिवारीने मुंबईच्या अमित मानेला (३-०) पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ६४ किलो वजनी गटात औरंगाबादच्या अमेय कांबळेने नागपूरच्या अजय जुगसणीयेचा व पुण्याच्या ऋषिकेश रणदिवेने अमरावतीच्या युनूस सय्यदचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

६९ किलो वजनी गटात पुण्याच्या केतन गायकवाडने कोल्हापूरच्या मयूर सांगळेवर विजय मिळवला व दुसर्‍या सामन्यात औरंगाबादचा कुणाल भांगे विजयी ठरला. ७५ किलो वजनी गटात लातूरच्या लक्ष्मीकांत हातकरने अमरावतीच्या रोहण शिंदेवर (२-१) व मुंबईच्या प्रथमेश शिंदेने पुण्याच्या अनिकेत शिंदेवर सहज विजय संपादन केला.

८१ किलो वजनी गटात मुंबईच्या मृणाल झारेकरने नाशिकच्या परेश वाणीवर व पुण्याच्या अशपाक मुलांनीवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. ९१ किलो वजनी गटात पुण्याच्या सूरज विधातेने अमरावतीच्या समीर अहमदवर व औरंगाबादच्या शिव गाडेकरने मुंबईच्या सूरज यादवचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ९१ किलो वरील वजनी गटात अमरावतीच्या हृतिक ढोरेने मुंबईच्या तौसिफ शेखचा व पुण्याच्या अजय पवारने नाशिकच्या आनंद पटेकरचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

टॅग्स :boxingबॉक्सिंग