क्रीडा : कबड्डी
By admin | Updated: September 1, 2014 20:00 IST
आशियाई स्पर्धेसाठी कबड्डी संघ जाहीर
क्रीडा : कबड्डी
आशियाई स्पर्धेसाठी कबड्डी संघ जाहीर मंुबई : भारतीय एमॅच्युअर कबड्डी महासंघाने १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान दक्षिण कोरियातील इंचियोन येथे होणार्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघ जाहीर केले आहेत़महासंघाचे अध्यक्ष डॉ़ मृदुल भदौरिया यांनी सांगितले की, दोन्ही संघांसाठी ५ ते २१ सप्टेंबरपर्यंत साई सेंटर भोपाळ येथे शिबीर आयोजित करण्यात येईल़ दोन्ही संघ २३ सप्टेंबरला दिल्लीहून इंचियोनला रवाना होतील़ आशियाई स्पर्धेत २८ सप्टेंबरपासून कबड्डी सामने होणार आहेत़ संघ पुढीलप्रमाणे : पुरुष टीम : राकेश कुमार, सुरजित सिंह, नवनीत गौतम, अजय ठाकूर, जसवीर सिंह,अनूप गुरप्रीत, राजगुरू, नितीन मादने, सुरजित, प्रवीण आणि मंजित छिल्लऱ रखीव खेळाडू : काशीलिंग अदाके, सूरज देसाई, चेरलाथन, शब्बीऱ महिला संघ : तेजस्विनी बाई, ममता पुजारी, प्रियंका, अभिलाषा म्हात्रे, सुष्मिता शर्मा, जयंती, कविता, अनिता मावी, कविता देवी, किशोरी शिंदे, पुजा ठाकूर आणि सुष्मिता पवाऱ राखीव : पायल चौधरी, रणदीप कौर, देवकृपा, ककोली विश्वास़