Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:34 IST2026-01-01T18:30:20+5:302026-01-01T18:34:41+5:30
इथं एक नजर टाकुयात क्रीडा प्रेमींसाठी खास अनुभूती देणाऱ्या यंदाच्या वर्षातील नियोजित महत्त्वाच्या स्पर्धेच्या वेळापत्रकावर...

Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
२०२६ हे नवे वर्ष क्रीडा जगतासाठी हे वर्ष ऐतिहासिक असणार आहे. त्यामुळेच क्रीडा प्रेमींसाठी हे वर्ष एकदम खास ठरेल. फुटबॉल आणि हॉकी वर्ल्ड कपशिवाय या वर्षी कॉमनवेल्थ गेम्स (ग्लास्गो), एशियन गेम्स (जपान) यांसारख्या मोठ्या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. बॅडमिंटन चॅम्पियनशिप, डायमंड लीग अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चमक दाखवताना दिसतील. इथं एक नजर टाकुयात क्रीडा प्रेमींसाठी खास अनुभूती देणाऱ्या यंदाच्या वर्षातील नियोजित महत्त्वाच्या स्पर्धेच्या वेळापत्रकावर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जगभरातील क्रीडा प्रेमींसाठी पर्वणीचा क्षण देणारी स्पर्धा यंदा तीन देशांत रंगणार
The year of the FIFA World Cup 2026 🌎🏆 pic.twitter.com/mz5V1BxrIu
— FIFA (@FIFAcom) January 1, 2026
यंदाच्या वर्षातील जगभरातील सर्व चाहत्यांसाठी उत्सुकतेची स्पर्धा कुठली असेल तर ती आहे फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच ४८ संघ सहभागी होणार आहेत. १२ जून २०२६ पासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये फुटबॉलचा थरार पाहायला मिळणार आहे. टेनिसमध्ये, वर्षाची सुरुवात पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपनने होईल. त्यानंतर भारतासाठी महत्त्वाचा ठरणारा डेव्हिस कप क्वालिफायर्स बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. टेबल टेनिसमध्ये चेन्नई येथे WTT स्टार कंटेंडर स्पर्धेचे आयोजन होईल. याशिवाय शूटिंग, स्क्वॉश, वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन यांसारख्या अनेक खेळांच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०२६ मध्ये पार पडणार आहेत.
२०२६ मधील प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा
कॉमनवेल्थ गेम्स
- ठिकाण: ग्लासगो
- कालावधी : २३ जुलै ते २ ऑगस्ट २०२६
एशियन गेम्स
- ठिकाण: जपान
- कालावधी: १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६
फुटबॉल
- फिफा वर्ल्ड कप २०२६
- १२ जून ते २६ जुलै २०२६
- यजमान देश: अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको
- या स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघ सहभागी होणार आहेत.
टेनिस स्पर्धा २०२६
- ऑस्ट्रेलियन ओपन - १२ जानेवारी ते १ फेब्रुवारी
- फ्रेंच ओपन- मे ते जून
- विंबल्डन - जून ते जुलै
- यूएस ओपन - ऑगस्ट ते सप्टेंबर
- ATP फायनल्स – नोव्हेंबर
अॅथलेटिक्स
- दोहा डायमंड लीग - मे २०२६
- नॅशनल ओपन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप - ऑक्टोबर २०२६ (नवी दिल्ली)
बॅडमिंटन
BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप - जुलै २०२६
- सैयद मोदी इंडिया इंटरनॅशनल सुपर 300 - नोव्हेंबर २०२६ (लखनौ)
- गुवाहाटी मास्टर्स - डिसेंबर २०२६
- ओडिशा मास्टर्स - डिसेंबर २०२६
- FIH प्रो लीग – फेब्रुवारी ते मार्च २०२६
- FIH हॉकी वर्ल्ड कप - ऑगस्ट २०२६
इतर क्रीडा स्पर्धा
- एशियन रायफल / पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप – फेब्रुवारी २०२६
- शूटिंग लीग ऑफ इंडिया - फेब्रुवारी–मार्च २०२६ (नवी दिल्ली)
- इंडियन ओपन स्क्वॉश- मार्च २०२६
- इंडियन ओपन गोल्फ- मार्च २०२६
- एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप - एप्रिल २०२६ (अहमदाबाद)