क्रीडा : धोनी
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
दबावाचा सामना करण्यास सक्षम -धोनी
क्रीडा : धोनी
दबावाचा सामना करण्यास सक्षम -धोनी एडिलेड : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आम्ही पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत दबावाचा सामना करण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे़ यापूर्वीही पाकविरुद्ध सर्वोत्कृष्ट खेळ करून आम्ही स्वत:ला सिद्ध केले आहे़ यावेळी या संघाविरुद्ध वर्ल्डकपमधील विजयी अभियान कायम राखू, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे़ धोनी म्हणाला की, आम्हाला ४० जे ५० हजार प्रेक्षकांसमोर सामना खेळण्याची सवय आहे़ त्यामुळे पाकविरुद्धच्या सामन्यावर आमच्यावर कोणताही दबाव नसेल़ उलट पाकिस्तान संघावर दबाव राहणार आहे़ कारण यापूर्वी वर्ल्डकपमध्ये झालेल्या सर्व सामान्यांमध्ये आम्ही त्यांना धूळ चारली आहे़ धोनीने सांगितले की, इतिहास आमच्या बाजूने असला तरी मी भूतकाळाला जास्त महत्त्व देत नाही़ वर्ल्डकपमधील सामन्यांसाठी खेळाडूंची तयारी उत्कृष्ट आहे़ याच बळावर आम्ही पाक संघावर सरशी साधू यात शंका नाही़ दरम्यान, धोनीव्यतिरिक्त आऱ आश्विन, विराट कोहली आणि सुरेश रैना या खेळाडूंचा २०११ च्या वर्ल्डकपमध्ये समावेश होता़ धोनी पुढे म्हणाला की, गत वर्ल्डकपमध्ये खेळलेले बरेच खेळाडू यावेळी नसले तरीही हा आमचा सर्वोत्कृष्ट संघ आहे़ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभांगात आम्ही वरचढ ठरू, असा विश्वास आहे़ (वृत्तसंस्था)