शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विशेष विजय : कोहली

By admin | Updated: December 8, 2015 02:23 IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ३३७ धावांनी मिळवलेल्या विजयासाठी संघाला मेहनत घ्यावी लागली. त्यामुळे हा विजय विशेष आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ३३७ धावांनी मिळवलेल्या विजयासाठी संघाला मेहनत घ्यावी लागली. त्यामुळे हा विजय विशेष आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजय मिळवला. पहिला व तिसरा कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपला तर चौथा कसोटी सामना पाच दिवस रंगला. बेंगळुरू कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत संपला. पुरस्कार वितरण समारंभानंतर बोलताना कोहली म्हणाला, ‘सर्वंच विजय महत्त्वाचे असतात, पण हा विजय अधिक महत्त्वाचा आहे. कारण यासाठी बराच घाम गाळावा लागला. दक्षिण आफ्रिका संघाने सामना अनिर्णीत राखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी गोलंदाजांना आक्रमक गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला आणि चहापानंतर त्यांनी तेच केले.’कोहली म्हणाला,‘मला दक्षिण आफ्रिकेच्या रणनीतीचे आश्चर्य वाटले. गोलंदाजांनी संयम ढळू न देता अचूक मारा केला. गोलंदाज आपल्या कामगिरीचा अभिमान बाळगू शकतात. संयम राखण्याचे दुसरे नाव कसोटी क्रिकेट आहे. मी एकटा काही करू शकत नाही, विजयाचे श्रेय सर्व ११ खेळाडूंना जाते.’कोहली पुढे म्हणाला,‘गोलंदाजांची पाठराखण करणे गरजेचे आहे. आमच्याकडे वेगवान मारा करणारे गोलंदाज आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना चांगली कामगिरी करण्याची संधी मिळते. आज त्यांनी तेच केले.’चौथ्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी करणारा अजिंक्य रहाणे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. रहाणे म्हणाला,‘मी एकाग्रता कायम राखली. मी नेहमी खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असतो. तंत्रावर विश्वास असेल तर निकाल अनुकूल मिळतात.’

मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेला रविचंद्रन आश्विन म्हणाला,‘मला आनंद झाला. चांगल्या मालिकेचा शानदार शेवट झाला. दक्षिण आफ्रिका संघाने सामना अनिर्णीत राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. आम्ही चांगली मेहनत घेतली व अखेर विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो. दुसऱ्या टोकाकडून रवींद्र जडेजाची चांगली साथ लाभली.’आश्विन पुढे म्हणाला,‘खेळपट्टीवर चेंडूला अधिक उसळी मिळत नव्हती. मला जडेजाची चांगली साथ लाभली. उमेशनेही आज चांगला मारा केला.’