शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष आमसभेत लोढा शिफारशींवर चर्चा होणार

By admin | Updated: June 12, 2017 20:03 IST

भारतीय क्रिकेट बोर्डाची(बीसीसीआय) विशेष आमसभा (एसजीएम) 26 जून रोजी होणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - भारतीय क्रिकेट बोर्डाची(बीसीसीआय) विशेष आमसभा (एसजीएम) 26 जून रोजी होणार आहे. या बैठकीदरम्यान संघासाठी नव्या कोचच्या निवडीवर कुठलीही चर्चा होणार नाही. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबाजवणी कशीकरायची यावर मंथन मात्र होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या या समितीच्या शिफारशी बीसीसीआय आणि मान्यताप्राप्त राज्य संघटनांमध्ये कशा लागू करायच्या यावर सविस्तर चर्चा केली जाईल, शिवाय दुबईत २९ मे रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत झालेल्या बैठकीतील मुद्यांवर चर्चा होणार आहे. बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी सर्व राज्य संघटनांना पाठविलेल्या नोटीसमध्ये सात मुद्यांवर चर्चा केली जाईल, असे लिहिले आहे. त्यात पीसीबीसोबतच्या बैठकीचा मुद्दा देखील आहे. बोर्डाचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी मागच्या महिन्यात दुबईत पीसीबी चेअरमन शहरयार खान यांच्यासोबत चर्चा केली होती.अनिल कुंबळे हेच कोचपदी कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खन्ना यांनी चौधरी यांना एक पत्र लिहून कोच निवड प्रक्रिया वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत स्थगित करण्याचा आग्रह केला होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची क्रिकेट सल्लागार समितीदेखील दीर्घकाळ सहकारी राहिलेले कुंबळे यांनाच कायम ठेवण्यास पसंती दर्शवित असल्याची माहिती आहे.याशिवाय आयसीसी बैठकीचा अहवाल, सीओएद्वारा ३० जानेवारीपासून घेतलेल्या निर्णयाची चित्रफित, या मोसमात झालेले दौरे आणि द्विपक्षीय मालिका, जम्मू काश्मीर तसेच राजस्थान क्रिकेट बोर्डातील क्रिकेटची प्रगती, आसाम क्रिकेट संघटनेने बांधलेले नवे स्टेडियम तसेच काम पूर्ण करण्यासाठी मागितलेले अर्थसाहाय्य आदी मुद्दे देखील आमसभेत चर्चेला येणार आहेत.