द. आफ्रिकेला विश्वचषक जिंकून द्यायचाय : डेल स्टेन

By Admin | Updated: May 13, 2015 00:13 IST2015-05-13T00:13:35+5:302015-05-13T00:13:35+5:30

पुढील विश्वचषक स्पर्धेत मला दक्षिण आफ्रिकेला चषक जिंकून द्यायचा असून, हेच माझे सर्वोच्च ध्येय असल्याचे प्रतिपादन ३१ वर्षीय

The South Africa win the World Cup: Dale Steyn | द. आफ्रिकेला विश्वचषक जिंकून द्यायचाय : डेल स्टेन

द. आफ्रिकेला विश्वचषक जिंकून द्यायचाय : डेल स्टेन

वृत्तसंस्था : पुढील विश्वचषक स्पर्धेत मला दक्षिण आफ्रिकेला चषक जिंकून द्यायचा असून, हेच माझे सर्वोच्च ध्येय असल्याचे प्रतिपादन ३१ वर्षीय धडाकेबाज गोलंदाज डेल स्टेन याने दिले आहे. मात्र जुलैत होत असलेल्या बांगलादेश दौऱ्यातील सहभागाबाबत मात्र त्याने अनिश्चितता व्यक्त केली आहे.
सध्या चांगलाच बहरात असलेल्या स्टेनला मात्र आपले वय व या पुढील कारकिर्दीचा पुरता अंदाज आहे. या विषयी तो म्हणाला मी फारकाळ याच पद्धतीने गोलंदाजी करु शकणारनाही याची मला पूर्ण जाणीव अहे. मात्र दक्षिण अफ्रिकेला विश्वचषक जिंकून देण्याची माझी इच्छा आहे. त्यालाच माझे प्राधान्य राहील. माझ्यादृष्टीने कसोटी क्रिकेट खूप आव्हानात्मक आहे.

Web Title: The South Africa win the World Cup: Dale Steyn