शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

सोमदेव पावला

By admin | Published: September 15, 2014 2:16 AM

भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू सोमदेव देववर्मनने लढवय्या लिएंडर पेस व रोहन बोपन्ना यांच्या कामगिरीपासून प्रेरणा

बंगलोर : भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू सोमदेव देववर्मनने लढवय्या लिएंडर पेस व रोहन बोपन्ना यांच्या कामगिरीपासून प्रेरणा घेत चमकदार कामगिरी केली आणि एकेरीच्या परतीच्या लढतीत सर्बियाचा अव्वल खेळाडू दुसान लाजोव्हिचची झुंज १-६, ६-४, ४-६, ६-३, ६-२ ने मोडून काढत भारताला डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत विश्व ग्रुप प्ले आॅफ लढतीत २-२ अशी बरोबरी साधून दिली. सोमदेवने जवळजवळ ३ तास ४० मिनिटे रंगलेल्या लढतीत विश्व क्रमवारी त्याच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या लाजोव्हिचचा पराभव केला. भारताला या लढतीत पहिल्या दिवशी एकेरीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. पेस व बोपन्ना यांनी शनिवारी दुहेरीच्या लढतीत दोन सेट्सने पिछाडीवर पडल्यानंतर चमकदार कामगिरी करीत मॅरेथॉन लढतीत विजय मिळविला. विश्व क्रमवारीत १४४ व्या स्थानावर असलेल्या सोमदेवने जागतिक क्रमवारीत ६१ व्या स्थानावर असलेल्या लाजोव्हिचचा पराभव केला. पहिला सेट गमाविणाऱ्या सोमदेवने त्यानंतर दमदार पुनरागमन केले. सोमदेवने विजयी गुण वसूल केल्यानंतर केएसएलटीए स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी जल्लोष केला. पहिला सेट १-६ ने गमाविणाऱ्या सोमदेवने दुसरा सेट ६-४ ने जिंकत १-१ अशाी बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये लाजोव्हिचनने ४-६ ने बाजी मारली आणि २-१ अशी आघाडी मिळविली. सोमदेवने त्यानंतर आक्रमक पवित्रा स्वीकारीत चौथा सेट ६-३ ने जिंकत २-२ अशी बरोबरी साधली. पाचव्या व निर्णायक सेटममध्ये सोमदेवने वर्चस्व गाजवित ६-२ ने सरशी साधत विजयावर शिक्कामोर्तब केले. सोमदेव आणि लाजोव्हिच यांच्यादरम्यानची लढत रंगतदार ठरली. सोमदेवने स्थानिक चाहत्यांचे समर्थन व मायदेशातील परिस्थितीचा लाभ घेतला. लाजोव्हिच चौथ्या व पाचव्या सेटमध्ये थकलेला भासत होता, तर सोमदेवमध्ये प्रत्येक गुण वसूल केल्यानंतर नवा उत्साह संचारल्याची प्रचिती मिळत होती. पहिल्या सेट गमाविणाऱ्या सोमदेवने दुसऱ्या सेटमध्ये लाजोव्हिचला रॅली खेळण्यास भाग पाडले. त्यामुळे लाजोव्हिचने अनेक चुका केल्या. (वृत्तसंस्था)