शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

सेरेना, मरे, फेडरर दुसऱ्या फेरीत

By admin | Updated: June 29, 2016 00:17 IST

अमेरिकेची सेरेना विलियम्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विम्बल्डनमध्ये विजयी सलामी दिली.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 29 - सात वेळचा विम्बल्डन विजेता टेनिससम्राट स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर, दुसरा मानांकित ब्रिटनचा अँडी मरे गतचॅम्पियन अग्रमानांकित अमेरिकेची सेरेना विलियम्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विम्बल्डनमध्ये विजयी सलामी दिली. गेल्या चार वर्षांमध्ये एकही ग्रँडस्लॅम जिंकू न शकलेल्या फेडररने यंदा आपला ग्रँड दुष्काळ संपवण्याचा निर्धार केला असून त्याने अपेक्षित सुरुवात केली. चुरशीच्या झालेल्या सलामीच्या सामन्यात फेडररने गुईडो पेलाला ७-६, ७-६, ६-३ असे नमवले. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत फेडररपुढे ब्रिटिश क्वालिफायर मार्कस विलिसचे आव्हान असेल. मार्कस जागतिक क्रमवारीत ७७२ व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे गुडघा आणि पाठदुखीमुळे फेडररने यंदाच्या फ्रेंच ओपनमधून माघार घेतली होती. यामुळे त्याच्या सलग ६५ ग्रँडस्लॅम खेळण्याच्या मालिकेला ब्रेक लागला.त्याचप्रमाणे, सहाव्या मानांकित मिलोस राओनिक, पाचव्या मानांकित केई निशिकोरी आणि १६ व्या मानांकित जाइल्स सिमोन यांनीही विजयी सलामी देताना आगेकूच केली. राओनिकने एकतर्फी झालेल्या सामन्यात सहज बाजी मारताना स्पेनच्या पाब्लो कारिनोचा ७-६, ६-२, ६-४ असा पराभव केला. निशिकोरीनेदेखील सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना आॅस्टे्रलियाच्या सॅम्युअल ग्रोथला ६-४, ६-३, ७-५ असे नमवले, तर सिमोनला मात्र विजयासाठी सर्बियाच्या जांको टिप्सारेविचविरुद्ध ४-६, ६-४, ७-५, ६-३ असे झुंजावे लागले. ब्रिटनच्या अँडी मरेने आपल्याच देशाच्या लियाम ब्राडीचा ६-२, ६-३, ६-४ असा पराभव केला.महिला एकेरीत अमेरिकेच्या सेरेना विलियमने स्वित्झर्लंडच्या अमरा सादिकोव्हिचचा १ तास १३ मिनिटे चाललेल्या लढतीत ६-२, ६-४ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जर्मनीच्या चौथ्या मानांकित अँजेलिका केर्बरने दणदणीत विजयी सलामी देताना ब्रिटनच्या लॉरा राब्सनचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला, तर फ्रेंच विजेती आणि दुसरी मानांकित गरबाइन मुगुरुजा हिनेही आपल्या लौकिकानुसार विजयी सुरुवात करताना इटलीच्या कॅमिली ज्योर्जीचे आव्हान ६-२, ५-७, ६-४ असे परतावले.