शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच सामन्यात सात्त्विक-अश्विनी जोडीचा सनसनाटी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST

स्वीस ओपन बॅडमिंटन

बासेल : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने बुधवारी आपल्याच देशाच्या समीर वर्मा याचे आव्हान संपुष्टात आणत स्वीस ओपन सुपर ३०० स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या भारतीय मिश्र दुहेरीच्या जोडीनेदेखील धडाकेबाज सुरुवात करीत इंडोनेशियाच्या हाफिज फैजल आणि ग्लोरिया इमॅनुअल विदजाजा या द्वितीय मानांकित जोडीवर सनसनाटी विजय मिळवला.आता जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावरील श्रीकांतची लढत फ्रान्सच्या थॉमस रुक्सेल आणि कॅनडाच्या जियाडोंग शेंग यांच्यादरम्यान होणाऱ्या लढतीतील विजयी खेळाडूशी होईल. दरम्यान, सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या भारतीय मिश्र दुहेरीच्या जोडीने सुरुवातीच्या फेरीत इंडोनेशियाच्या हाफिज फैजल आणि ग्लोरिया इमॅनुअल विदजाजा या द्वितीय मानांकित आणि जागतिक क्रमवारीतील आठव्या क्रमांकावरील जोडीचा २१-१८, २१-१० असा सनसनाटी पराभव केला. गत एका महिन्यापासून परदेशी प्रशिक्षक कोच माथियास बो यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग घेणाऱ्या सात्त्विक आणि अश्विनी या जोडीची लढत आता एक अन्य इंडोनेशियाची जोडी रिनोव रिवाल्डी आणि पिठा हॅनिंगटायस मेंटारी यांच्याशी होईल. तथापि, अन्य भारतीय खेळाडू प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी या मिश्र दुहेरीच्या जोडीला इंग्लंडच्या मार्कस एलिस आणि लॉरेन स्मिथ या तृतीय मानांकित जोडीकडून ३९ मिनिटांत १८-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला.२०१५ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या चौथ्या मानांकित श्रीकांतने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात एका तासापेक्षा जास्त वेळ रंगलेल्या चुरशीच्या लढतीत आपलाच सहकारी २०१८ चा विजेता समीर वर्मा  याचा १८-२१, २१-१८, २१-११ असा पराभव केला.