शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशी भारताचे वर्चस्व, १४२ धावांची आघाडी

By admin | Updated: November 6, 2015 17:24 IST

चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ६३ धावांच्या जोरावर भारताने मोहाली कसोटीत दुसऱ्या डावात १४२ धावांची आघाडी घेतली आहे.

ऑनलाइन लोकमत

मोहाली, दि. ६ - चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ६३ धावांच्या जोरावर भारताने मोहाली कसोटीत दुसऱ्या डावात १४२ धावांची आघाडी घेतली आहे. मोहाली कसोटीच्‍या दुस-या दिवशी आर. अश्विन (५ ), रवींद्र जडेजा(३) आणि अमित मिश्राच्‍या (२) घातक गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेस १८४ धावात गुंडाळले. त्यांतर दुसऱ्या डावात पुजारा(६३) आणि मुरली विजयच्या (४७)संयमी खेळीच्या जोरावर दुसऱ्या दिवशी भारताने आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले.  शिखर धवन (०) दुसऱ्या डावातही स्वस्तात बाद झाला. सध्या कर्णधार विराट कोहली (११) आणि चेतेश्वर पुजारा(६३) मैदानावर आहेत. आफ्रिकेतर्फे ताहिर आणि फिलींडरने एक एक बळी मिळवला. 

मोहाली कसोटीच्या दुस-या दिवशी आफ्रिकेने २ बाद २८ वरुन पुढे खेळायला सुरुवात केली. डिन एल्गार आणि हाशिम आमला या जोडीने सावध सुरुवात करत आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एल्गार ३७ धावांवर असताना अश्विनच्या फिरकीवर तो झेलबाद झाला. तर अश्विनने हाशिम आमलाचा अडसर दूर करत भारताला मोठे यश मिळवून दिले. हामला ४३ धावांवर बाद झाला. यानंतर डेन विलासला स्वस्तात माघारी पाठवण्यात अश्विनला यश आले. लंचपर्यंत आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत परतला. 
 
त्यानंतरहीआफ्रिकेची पडझड सुरूच होती, मात्र एबी डीव्हिलयर्स खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर आफ्रिकेने दीडशे धावांचा टप्पा ओलांडला. एकीकडे अश्विनच्या गोलंदाजीमुळे आफ्रिकेचे फलंदाज बेजार झालेले असतानाच जडेजा आणि मिश्रानेही पटापट बळी मिळवल्याने आफ्रिकेचा डाव १८४ धावांत संपुष्टात आला.