शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

सौरभ वर्माला विजेतेपद

By admin | Updated: October 17, 2016 04:49 IST

मलेशियाच्या डॅरेन ल्यू याला अंतिम सामन्यात हरवून ५५ हजार डॉलर्स बक्षीस रकमेच्या चिनी तैपेई बॅडमिंटन ग्रां.प्री. स्पर्धेचे एकेरीचे अजिंक्यपद मिळवले.

तैपेई सिटी : दुखापतीतून सावरणाऱ्या सौरभ वर्माने आज, रविवारी येथे मलेशियाच्या डॅरेन ल्यू याला अंतिम सामन्यात हरवून ५५ हजार डॉलर्स बक्षीस रकमेच्या चिनी तैपेई बॅडमिंटन ग्रां.प्री. स्पर्धेचे एकेरीचे अजिंक्यपद मिळवले.मध्य प्रदेशच्या २३ वर्षीय सौरभने पहिल्या दोन गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर आगेकूच करीत अजिंक्यपद जिंकले. तिसऱ्या गेममध्ये ल्यू खांद्याच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला. त्या वेळी सौरभ १२-१0, १२-१0, ३-३ असा आघाडीवर होता. गेल्या वर्षीपासून कोपर आणि घोट्याच्या दुखापतीमुळे जवळजवळ एक वर्षभर तो मैदानाबाहेर राहिला होता. या स्पर्धेपूर्वी सौरभने बेल्जियम आणि पोलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले आहे.आजच्या सामन्यात सौरभने चांगली सुरुवात केली. पहिल्या गेममध्ये तो ५-३ असा आघाडीवर होता. ल्यूने यानंतर सलग पाच पॉर्इंटची कमाई करीत ८-५ ने आघाडी घेतली. तथापि, सौरभने १0-७ असा गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ल्यूने चांगली सुरुवात करीत ५-१ अशी आघाडी मिळवली, एक वेळ तो १0-६ असा आघाडीवरही होता, परंतु सौरभने त्यानंतर सलग चार गुण जिंकत बरोबरी साधली. त्यानंतर दोन पॉर्इंट मिळवत गेमही जिंकला. तिसऱ्या गेममध्ये ३-३ अशी बरोबरी असताना ल्यूने खांदा दुखावल्यामुळे सामना सोडण्याचा निर्णय घेतला. सामन्यानंतर सौरभ म्हणाला, ‘‘माझ्यासाठी हा विजय शानदार आहे, आणि याची मला अतिशय गरज होती. प्रतिस्पर्धी खेळाडूने चांगला खेळ केला. परंतु शेवटी विजय माझ्या पदरात पडल्याने मी आनंदित आहे. आता आपले लक्ष्य पहिल्या ४0मध्ये मानांकन मिळवण्याचे असल्याचेही सौरभने सांगितले.