शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी संजना सज्ज

By admin | Updated: October 24, 2015 02:47 IST

पेरु येथील लिमा शहरात रंगणाऱ्या १७ व्या जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय (१९ वर्षांखालील) संघात मुंबईच्या संजना संतोषची निवड झाली. तर मुलांमध्ये चिराग

मुंबई : पेरु येथील लिमा शहरात रंगणाऱ्या १७ व्या जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय (१९ वर्षांखालील) संघात मुंबईच्या संजना संतोषची निवड झाली. तर मुलांमध्ये चिराग शेट्टीची वर्णी लागली आहे. गुजरातची अव्वल खेळाडू अनुष्का पारीखसह संजना दुहेरी गटात विजेतेपदासाठी लढेल. चीन, इंडोनेशिया, थायलँड आणि युरोपीयन देशांच्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील दुहेरीच्या लढती ४ ते ८ नोव्हेंबर पर्यंत रंगणार असून एकेरी सामने १० ते १५ नोव्हेंबर दरम्यान होतील. स्पर्धेबाबत संजना म्हणाली, गेली अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमामुळे मला जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. आतंरराष्ट्रीय खेळाडू उदय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी या स्पर्धेसाठी सज्ज असून अनुष्कासह भारतासाठी चमकदार खेळ करण्याचा पुर्ण प्रयत्न असेल. चर्चगेटच्या एच.आर. कॉलेजमध्ये कॉमर्स प्रथम वर्षात शिकणारी संजना वयाच्या आठव्या वर्षापासून बॅडमिंडन खेळत आहे. नुकत्याच पुणे येथे झालेल्या पुणे ज्युनियर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत तीने रौप्यपदकावर नाव कोरले. त्याचप्रमाणे गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या आॅल इंडिया ज्युनियर नॅशनल स्पर्धेत देखील तीने रौप्य पदकावर कब्जा केला.