शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सानिया-हिंगीसची घोडदौड

By admin | Updated: April 2, 2015 01:35 IST

गेल्या महिन्यात परीबस ओपनचे विजेतेपद जिंकणारी भारतीय टेनिसतारका सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या

मियामी : गेल्या महिन्यात परीबस ओपनचे विजेतेपद जिंकणारी भारतीय टेनिसतारका सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या जोडीने मियामी ओपनच्या महिला दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. दरम्यान, पुरुष गटात एका सेटने पिछाडीवर पडल्यानंतरही जबरदस्त मुसंडी मारताना जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविचने उपांत्यपूर्व फेरी गाठली.महिला दुहेरीत अव्वल मानांकित जोडी सानिया आणि हिंगीस यांनी अनास्तासिया आणि एरिना रोडियोनोव्हा या जोडीचा ६-३, ६-४ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता त्यांची लढत सातव्या मानांकित हंगेरीच्या टिमियो बाबोस आणि फ्रान्सच्या क्रिस्टिना म्लादेनोविच जोडीशी होईल.दरम्यान, जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविचने एका सेटने पिछाडीवर पडल्यानंतरही जोरदार मुसंडी मारताना यूक्रेनच्या अलेक्झांडर डोल्गोपोलोव्हचा ६-७, ७-५, ६-० असा पराभव करीत मियामी ओपनमधील उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.जोकोविचची पुढील फेरीतील लढत आता स्पेनचा सहावा मानांकित डेव्हिड फेररशी होईल. फेररने फ्रान्सच्या जाइल्स सिमोनचा ७-६, ६-० असा पराभव केला. अन्य लढतींत ब्रिटनच्या तृतीय मानांकित अँडी मरेने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनचा ६-४, ३-६, ६-३ असा पराभव करताना कारकिर्दीतील ५०० वा विजय मिळवला.आता त्याची लढत आॅस्ट्रियाच्या डोमिनिक थियेम याच्याशी होईल. डोमेनिकने फ्रान्सच्या अ‍ॅड्रियन मानारिनोलाचा ७-६, ४-६, ७-५ असा पराभव केला. रॅफेल नदालला धूळ चारणाऱ्या जपानच्या चौथ्या मानांकित केई निशीकोरीने बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनचा ६-१, ६-२ असा पराभव केला. आता त्याची लढत अमेरिकेच्या जॉन इसनेरशी होईल. इसनेरने कॅनडाच्या मिलोस राओनिच याच्यावर ६-७, ७-६, ७-६ असा विजय मिळवला. झेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डीचची लढत उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या जुआन मोनाका याच्याशी होईल.महिला गटात स्पेनच्या १२ व्या मानांकित कार्ला सुआरेज नवारो याने तीन वेळची चॅम्पियन व्हीनस विल्यम्स हिचा ०-६, ६-१, ७-५ असा पराभव केला. ती उपांत्य फेरीत जर्मनीच्या नवव्या मानांकित आंद्रिया पेत्कोविचशी दोन हात करील. आंद्रियाने झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हावर ६-४, ६-२ अशी मात केली. (वृत्तसंस्था)