सायना उपांत्य फेरीत

By Admin | Updated: April 4, 2015 04:11 IST2015-04-04T04:11:40+5:302015-04-04T04:11:40+5:30

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताच्या सायना नेहवालने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या संघर्षपूर्ण लढतीत चीनच्या सून यूचा पराभव केला

Saina in semifinals | सायना उपांत्य फेरीत

सायना उपांत्य फेरीत

क्वालालम्पूर : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताच्या सायना नेहवालने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या संघर्षपूर्ण लढतीत चीनच्या सून यूचा पराभव केला आणि मलेशियन ओपन सुपर सिरीज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. तिसऱ्या मानांकित भारतीय बॅडमिंटनपटूने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सूनचा २१-११, १८-२१, २१-१७ ने पराभव केला. ही लढत १ तास ११ मिनिटे रंगली. सायनाला यानंतर आॅलिम्पिक चॅम्पियन ली झुरेईच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. झुरेईने दुखापतीमुळे गेल्यावर्षी बीडब्ल्यूएफ विश्व सुपर सिरीज स्पर्धेतून माघार घेतली होती. गेल्या आठवड्यात इंडिया सुपर सिरीज स्पर्धेतही झुरेई सहभागी झाली नव्हती. दोनदा विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकाचा मान मिळविणाऱ्या झुरेईने सायनाचा आठ वेळा पराभव केला आहे तर सायनाला केवळ दोनदा सरशी साधण्यात यश आले आहे. सायनाने २०१०मध्ये सिंगापूर ओपन आणि २०१२मध्ये इंडोनेशिया ओपनमध्ये झुरेईचा पराभव केला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina in semifinals