शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

सायना नेहवाल दुस-या फेरीत

By admin | Updated: October 24, 2014 03:23 IST

तथापि, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू हिचे आव्हान संपुष्टात आले आहे.

पॅरिस : स्टार खेळाडू आणि पाचवी मानांकित भारताची सायना नेहवाल आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील सुवर्णपदकविजेता पारुपल्ली कश्यप यांनी बुधवारी शानदार विजय मिळवताना फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तथापि, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू हिचे आव्हान संपुष्टात आले आहे.आठव्या मानांकित सिंधूला पहिल्याच फेरीत बाद होण्याची नामुष्की सहन करावी लागली. सिंधूला थायलंडच्या पोर्नटिप बुरानाप्रासर्तसुक हिने ५६ मिनिटांत १२-२१, २१-१८, २१-१६ असे पराभूत केले. सिंधूने पहिला गेम जिंकून शानदार सुरुवात केली; परंतु त्यानंतर ती आपली लय कायम ठेवू शकली नाही आणि दोन्ही गेममध्ये तिला पराभव पत्करावा लागला.दरम्यान, सायना नेहवालने फ्रान्सची साशिना विग्नेस वॉरन हिचा अवघ्या ३७ मिनिटांत २१-१६, २१-९, असा पराभव केला. सायनाची पुढील फेरीतील लढत स्कॉटलंडच्या कर्स्टी गिलमूर हिच्याशी होईल.राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्या कश्यपने तृतीय मानांकित जपानच्या केनिची तागो हिचा २१-११, २१-१८ असा पराभव केला. कश्यपने सुरेख सुरुवात करताना जपानी खेळाडूचा अवघ्या ३५ मिनिटांत धुव्वा उडवला. कश्यपची पुढील फेरीतील लढत चीनच्या होऊवेई तियान याच्याविरुद्ध होईल.पुरुष एकेरीतील दोन अन्य लढतींत भारतीय खेळाडू एच. एस. प्रणय आणि सौरभ वर्मा यांना पहिल्याच फेरीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. प्रणयला जपानच्या केंतो मोमोतो याने एक तास ९ मिनिटांच्या लढतीत २१-११, १५-२१, २२-२० असे, तर सौरभला इंग्लंडच्या राजीव ओसफने ३० मिनिटांत २१-१०, २१-११ असे पराभूत केले. पोनप्पाने ज्वाला गुट्टाच्या साथीने महिला दुहेरीच्याही दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. ज्वाला आणि अश्विनी या जोडीने हॉलंडच्या एफ्जे मस्डेंस आणि सेलेना पीक या जोडीवर ५२ मिनिटांत १८-२१, २१-१६, २१-१४ अशी मात केली. (वृत्तसंस्था)