सायना नेहवालला डिस्चार्ज

By Admin | Updated: August 23, 2016 04:17 IST2016-08-23T04:17:51+5:302016-08-23T04:17:51+5:30

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला सोमवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला.

Saina Nehwal discharges | सायना नेहवालला डिस्चार्ज

सायना नेहवालला डिस्चार्ज


मुंंबई : बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला सोमवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. कोकिलाबेन धीरुभाई अंबांनी रुग्णालयात सायनाच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर सायनाची प्रकृती लवकर सुधारल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
सोमवारी सकाळी सायनाला डिस्चार्ज देण्यात आला. पायदुखमीमुळे त्रस्त झालेल्या सायनावर शनिवारी शस्त्रक्रिया झाली होती. तिच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर अर्थोस्कॉपिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सायनाला झालेल्या दुखापतीनंतर तिच्या उजव्या गुडघ्याच्या वाटीजवळचे हाड सरकले होते. त्यामुळे तिला गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला होता. प्राथमिक तपासण्या केल्यावर तिला शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. शुक्रवारी ती हैद्राबादहून मुंबईला दाखल झाली. डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. (प्रतिनिधी)

Web Title: Saina Nehwal discharges