शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जपान ओपन सीरिजवर सायनाच्या नजरा

By admin | Updated: September 8, 2015 04:36 IST

विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवणारी जगातील नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आता जपान ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे.

टोकीयो : विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवणारी जगातील नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आता जपान ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेत साजेशी कामगिरी करून किताब पटकाविण्याचे आव्हान तिच्यापुढे असेल. २ लाख ७५ हजार डॉलर रकमेची ही स्पर्धा आहे. २५ वर्षीय सायनाने गेल्या महिन्यात विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकाविले होते. याच कामगिरीच्या आधारावर तिने पुन्हा एकदा नंबर वनचा ताज पटकाविला होता. स्पर्धेत दुसरी मानांकित सायना आता आपल्या मोहिमेची सुरुवात बुधवारी थायलंडच्या बुसानन ओंगबुमरुंगपानविरुद्धच्या सामन्याने करणारा आहे. या सामन्यात तिने विजय मिळवल्यास पुढील फेरीत तिची लढत मायदेशाच्या पी. व्ही. सिंधूविरुद्ध होईल. असे झाल्यास, आंतरराष्ट्रीयस्तरावर सायना आणि सिंधू हे पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील. याआधी, २०१४ मध्ये इंडिया ग्राप्री गोल्ड फायनलमध्ये दोन्ही खेळाडू आमने-सामने ठाकल्या होत्या. ज्यात सायनाने बाजी मारली होती. पहिल्या सामन्यात सिंधू हिला जगातील १८ वी मानांकित जपानची मिनात्सु मितानी हिच्याविरुद्ध खेळावे लागेल. पुरुष एकेरीत, राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेता पारुपल्ली कश्यप आपल्या मोहिमेची सुरुवात ताकुआ उएदा याच्याविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. जगातील आठव्या क्रमांकाचा कश्यप याने ताकुआला दोन वेळा पराभूत केले आहे. मात्र, २०१३ मध्ये जपानच्या याच खेळाडूने सिंगापूर ओपनमध्ये कश्यपला हरविले होते. त्यामुळे हा सामनासुद्धा रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)