सईद अजमलच्या भविष्याचा फैसला २४ जानेवारीला

By Admin | Updated: January 14, 2015 02:20 IST2015-01-14T02:20:22+5:302015-01-14T02:20:22+5:30

संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे निलंबित झालेला पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज सईद अजमलची अधिकृत गोलंदाजी चाचणी २४ जानेवारी रोजी चेन्नईत करण्यात येणार आहे

Saeed Ajmal's decision on his future will be on January 24 | सईद अजमलच्या भविष्याचा फैसला २४ जानेवारीला

सईद अजमलच्या भविष्याचा फैसला २४ जानेवारीला

कराची : संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे निलंबित झालेला पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज सईद अजमलची अधिकृत गोलंदाजी चाचणी २४ जानेवारी रोजी चेन्नईत करण्यात येणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिली आहे़
पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) प्रवक्त्याने स्थानिक वाहिनीला सांगितले की, अजमलच्या अधिकृत गोलंदाजी चाचणीसाठी पीसीबीने आयसीसीकडे वेळ मागितली होती़ त्यानंतर आयसीसीने आगामी २४ जानेवारी रोजी अजमलची चाचणी घेण्याचे निश्चित केले आहे; मात्र आम्हाला आयसीसीकडून आतापर्यंत अधिकृत पत्र मिळालेले नाही़ पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघातून बाहेर झालेल्या अजमलने अधिकृत चाचणीपूर्वी गोलंदाजी शैली सुधारण्यासाठी काही दिवस मुदत द्यावी, अशी मागणी केली होती़ (वृत्तसंस्था)

Web Title: Saeed Ajmal's decision on his future will be on January 24