शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रोव्हर्सला आणखी दोन पदके

By admin | Updated: September 26, 2014 04:37 IST

भारतीय रोव्हर्सनी गुरुवारी चमकदार कामगिरी करताना दोन पदकांची कमाई केली, तर महिला नेमबाजांनी कांस्यपदक पटकाविले.

इंचियोन : भारतीय रोव्हर्सनी गुरुवारी चमकदार कामगिरी करताना दोन पदकांची कमाई केली, तर महिला नेमबाजांनी कांस्यपदक पटकाविले. त्यामुळे १७व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकतालिकेतील १५ वे स्थान कायम राखले. सेनेच्या स्वर्णसिंग विर्कने सिंगल स्कल्समध्ये तिसरे स्थान पटकाविले, तर त्यानंतर ८ खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाने कांस्यपदकाचा मान मिळविला. नेमबाजीमध्ये महिला संघाने डबल ट्रॅप नेमबाजीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. भारताने तिरंदाजीमध्ये रौप्यपदक निश्चित केले. या व्यतिरिक्त स्क्वॅशमध्ये भारतीय पुरुष व महिला संघांनी उपांत्य फेरीत धडक मारताना पदक निश्चित केले. हॉकी मैदानावर मात्र भारताची कामगिरी निराशाजनक झाली. भारतीय पुरुष संघाला ‘ब’ गटात खेळल्या गेलेल्या संघर्षपूर्ण लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध १-२ने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे पुढील फेरी गाठण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. आज तीन पदकांची कमाई केल्यामुळे भारताच्या खात्यात एकूण १५ पदकांची नोंद आहे. त्यात एक सुवर्ण, एक रौप्य व १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. चीन एकूण १३८ पदकांसह (७२ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ३० कांस्य) अव्वल स्थानावर कायम आहे. त्यानंतर दक्षिण कोरिया (२८ सुवर्ण, २९ रौप्य, २८ कांस्य) आणि जापान (२२ सुवर्ण, ३३ रौप्य व २८ कांस्य) यांचा क्रमांक आहे. भारतातर्फे आज रोव्हर्सची कामगिरी उल्लेखनीय ठरली. रोइंगमध्ये भारताने तीन कांस्यपदकांची कमाई केली. दुष्यंत चव्हाणने बुधवारी पुरुषांच्या लाइटवेट सिंगल स्कल्समध्ये कांस्यपदक पटकाविले. २०१० च्या तुलनेत भारतीय ही कामगिरी कमकुवत आहे. त्यावेळी भारताने एक सुवर्ण, तीन रौप्य व एक कांस्यपदक पटकाविले होते. कांस्यपदक विजेत्या भारतीय संघात कपिल शर्मा, रणजित सिंग, २०१० मध्ये सिंगल स्कल्समध्ये सुवर्णपदक पटकाविणारा बजरंग लाल ठाकर, पी. यू. रॉबिन, के. सावन कुमार, मोहम्मद आजाद, मणिंदर सिंग, दविंदर सिंग आणि मोहम्मद अहमद यांचा समावेश होता. भारतीय पुरुषानंतर महिला संघाला सेपकटकरामध्ये यजमान दक्षिण कोरियाकडून पराभव स्वीकारावा लागला़ पुरुष संघाला ‘अ’ गटात दक्षिण कोरियाकडून ०-३ ने पराभवाची नामुष्की ओढावली, तर महिला संघ ‘ब’ गटात ०-३ ने मात खावी लागली़ (वृत्तसंस्था)