शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘अर्जुन’साठी शिफारस गौरवाची बाब : रोहित

By admin | Updated: April 28, 2015 00:30 IST

बीसीसीआय’तर्फे अर्जुन पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आल्यामुळे आनंद झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या रोहित शर्माने ही माझ्यासाठी गौरवाची बाब असल्याचे म्हटले आहे.

मुंबई : ‘बीसीसीआय’तर्फे अर्जुन पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आल्यामुळे आनंद झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या रोहित शर्माने ही माझ्यासाठी गौरवाची बाब असल्याचे म्हटले आहे. रोहित म्हणला, ‘बीसीसीआयने या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस केल्यामुळे आनंद झाला. रविवारी हे वृत्त ऐकल्यानंतर चांगले वाटले.’ बीसीसीआयने रविवारी कोलकाता येथे झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत अर्जुन पुरस्कारासाठी रोहितचे नाव पाठविण्याचा निर्णय घेतला. रोहितने गेल्या मोसमात श्रीलंकेविरुद्ध विक्रमी २६४ धावांची खेळी केली होती. वन-डे क्रिकेट इतिहासात दोन द्विशतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे.आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा रोहित म्हणाला, ‘यंदाच्या मोसमात संघाची कामगिरी विशेष चांगली झालेली नसली तरी दोन दिवसांपूर्वी हैदराबाद संघाविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल, अशी आशा आहे. आम्हाला चांगली फलंदाजी करण्याची संधी होती. गोलंदाजांनी या लढतीत आम्हाला विजय मिळवून दिला. आगामी सामन्यांमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे. रोहित पुढे म्हणाला, ‘हेजलवुडने सुरुवातीलाच स्पर्धेतून माघार घेतली असून आता अँडरसनने माघार घेतल्यामुळे आम्हाला धक्का बसला, पण त्यामुळे कोलिन मुन्रो (न्यूझीलंड) आणि मिशेल मॅक्लेनघन यांना छाप सोडण्याची संधी मिळाली आहे.’ ‘यंदाच्या मोसमात संघाची कामगिरी विशेष चांगली झालेली नसली तरी दोन दिवसांपूर्वी हैदराबाद संघाविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल, अशी आशा आहे.’- रोहित शर्मा,कर्णधार , मुंबई इंडियन्स