आरडी बॉइज संघाने जिंकली फुटबॉल स्पर्धा

By Admin | Updated: August 24, 2016 23:44 IST2016-08-24T23:17:08+5:302016-08-24T23:44:40+5:30

देवळाली कॅम्प : येथील जमीलभाई सय्यद स्पोर्ट्स क्लब यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक जिल्हास्तरीय स्पर्धेत बुधवारी (दि. २४) अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत आर. डी. बॉइज संघाने गांधीनगर संघाचा ५ विरुद्ध ३ अशा गोलने पराभव करून स्पर्धेतील विजेतेपद पटकावले.

RD Boys win the football tournament | आरडी बॉइज संघाने जिंकली फुटबॉल स्पर्धा

आरडी बॉइज संघाने जिंकली फुटबॉल स्पर्धा

देवळाली कॅम्प : येथील जमीलभाई सय्यद स्पोर्ट्स क्लब यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक जिल्हास्तरीय स्पर्धेत बुधवारी (दि. २४) अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत आर. डी. बॉइज संघाने गांधीनगर संघाचा ५ विरुद्ध ३ अशा गोलने पराभव करून स्पर्धेतील विजेतेपद पटकावले.
आनंदरोड मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेत सकाळच्या सत्रात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आर. डी. बॉइज संघाने तिरंगा संघाचा तर गांधीनगर संघाने आनंद बॉइज संघाचा पराभव करून अंतिम फे री गाठली. अंतिम सामना निर्धारित वेळेत १-१ असा बरोबरीत सुटल्याने ट्रायब्रेकरमध्ये आर. डी. संघाने बाजी मारली. यावेळी विजयी संघाला माजी खासदार राजाभाऊ गोडसे, रिपाइं जिल्हा संघटक संतोष कटारे, संजय कल्याणी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी दीपक लखन आणि भूषण रॉय यांनी पंच म्हणून काम पाहिले. (वार्ताहर)
 
Web Title: RD Boys win the football tournament