शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

‘रामचंद्रन हटाव’ मुद्द्यावर फूट?

By admin | Updated: June 17, 2015 02:12 IST

भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना पदावरून दूर करण्यासाठी अविश्वास आणण्याची मागणी

नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना पदावरून दूर करण्यासाठी अविश्वास आणण्याची मागणी करणाऱ्या क्रीडा संघटकांमध्ये फूट पडल्याची चिन्हे दिसत आहेत. हा मुद्दा आता संपला असल्याचे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त करताच ‘कुठे तरी पाणी मुरले असावे,’ असा अर्थ काढण्यात येत आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी रामचंद्रन हटाव मोहीम सुरू केली. अनेक राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि राज्य आॅलिम्पिक संघटनांनी त्यांच्या मोहिमेला बळ देऊन जाहीर पाठिंबा दिला होता. विशेष आमसभा लवकरात लवकर बोलावण्याची मागणीदेखील सातत्याने होऊ लागली होती. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या महिन्याच्या अखेरीस आयओएच्या एका गटाने अनौपचारिक बैठक बोलावली होती. या बैठकीत आयओएचे माजी अध्यक्ष अभयसिंह चौटाला आणि सचिव ललित भानोत यांनी या सदस्यांना बत्रा यांच्या मोहिमेत सहभागी होऊ नका, असे बजावले. आयओएच्या एका अधिकाऱ्याच्या मते, रामचंद्रन हटाव मोहीम आता संपली आहे. रामचंद्रन हटाव मोहिमेस बळ दिल्यास परिस्थिती चिघळेल. शिवाय, विशेष आमसभा बोलावली, तरी रामचंद्रन यांचे काहीही वाकडे होऊ शकणार नसल्याची जाणीव चौटाला तसेच भानोत यांनी सदस्यांना करून दिली.’’ बत्रा यांनीदेखील मंगळवारी सर्व नाराज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना ई-मेल पाठवून भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेनेदेखील रामचंद्रन हटाव मोहिमेस पाठिंबा दिल्याची आठवण करून दिली. शिवाय, ५० टक्क्यांहून अधिक महासंघ आणि राज्य संघटनांचा पाठिंबा असल्याने विशेष आमसभा बोलावण्यावर भर दिला. दरम्यान, अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले, की महासंघाने रामचंद्रन यांच्या कार्यशैलीशी संबंधित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावण्याची मागणी केली होती; रामचंद्रन यांना हटविण्यासाठी नव्हे! रामचंद्रन यांच्या कार्यशैलीवरून जे मुद्दे पुढे आले, त्यावर आम्ही तोडगा काढण्याची मागणी केली; त्यांचा राजीनामा मागितला नव्हता. (वृत्तसंस्था)