शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

भारत श्री 2018 : राम नवमीला रामाचाच विजय! सुनीत जाधवचे हॅटट्रिकचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 2:51 PM

सुनीत जाधवचे भारत श्रीच्या हॅटट्रिकचे स्वप्न उदध्वस्त करीत राम निवासने अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला.  

 पुणे -  सुनीत जाधवचे भारत श्रीच्या हॅटट्रिकचे स्वप्न उदध्वस्त करीत राम निवासने अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला.  मध्यरात्रीचे दोन वाजले होते. हजारोंच्या संख्येने गर्दी करणा-या क्रीडाप्रेमींना एकच प्रश्न सतावत होता, सुनीत की राम निवास? याचे उत्तर जजेसनाही सापडत नव्हते. दोन-दोन वेळा कंपेरिजन केल्यानंतरही प्रश्न कायम होता. अशा श्वास रोखून धरणा-या सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकाराची गरज असताना षटकार ठोकावा तसाच थरारक विजय रेल्वेच्या राम निवासने मिळविला. रोहितला उपविजेतेपद तर दिल्लीच्या नरेंदर यादवला तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दहापैकी पाच गटात सोनेरी कामगिरी करणारा रेल्वे सांघिक विजेतेपदाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राला पुन्हा एकदा उपविजेतेपदाचाच मान मिळविता आला.

बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात भारतीय शरीरसौष्ठवाचा कुंभमेळा थरारक, उत्कंठावर्धक आणि ऐतिहासिक झाला. 584 खेळाडूंच्या उपस्थितीने विक्रम रचणा-या अकराव्या भारत श्रीचा समारोप हृदयाचे ठोके चुकवणारा ठरला. सुनीत कडवे आव्हान परतावून भारत श्रीची हॅटट्रीक करणार या आशेने हजारो शरीरसौष्ठवप्रेमी तहानभूक विसरून हजारम झाले होते.  चॅम्पियन ऑफ चॅम्पियनच्या गटात सुनीतसमोर राम निवास आणि अनुज कुमारचे कडवे आव्हान होते. मात्र पहिल्या कंपेरिजनमध्ये अनुज मागे पडला आणि भारत श्रीचा फैसला सुनीत आणि राम निवासमध्येच लागणार हे स्पष्ट झाले. दोघेही एकास एक असल्यामुळे जजेसची दोघांनी कंपेरिजन केली. यात दोघांचेही समान गुण झाले. त्यामुळे निकाल लावण्यासाठी भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी माजी विश्व श्री प्रेमचंद डेगरा, व्यायाममहर्षी  मधुकर तळवलकर यांना जजेसच्या जागी बसवण्यात आले आणि या तिस-या कंपेरिजनमध्ये राम निवासने सुनीतवर  निसटता विजय नोंदवला. पाठारे यांनी उपविजत्याचे नाव घोषित करताना घेतलेला पॉझ क्रीडाप्रेमींना धक्का देऊन केला. भारत श्रीचा किताब राम निवासने जिंकला असला तरी पुणेकरांची मनं सुनीतनेच जिंकली. 50 लाखांच्या रोख पुरस्कार रकमेच्या शरीरसौष्ठवाच्या कुंभमेळ्याचा वितरण सोहळा पद्मश्री प्रेमचंद डेगरा, व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर,   चेतन पाठारे, ऍड. विक्रम रोठे, मदन कडू, राजेश सावंत, अजय खानविलकर आणि प्रशांत आपटे यांच्या उपस्थितीत पार पडला. गटात एक लाख जिंकणा-या रामनिवासला साडे सात लाख रूपयांचे रोख इनामही मिळाले. सोबत तटकरेंनी जाहीर केलेल्या 51 हजार रूपयांसह नऊ लाख रूपयांची कमाई केली. शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासातच गटविजेतेपदाला एक लाख आणि विजेत्याला साडेसात लाख रूपयांनी गौरविण्यात आले.

तब्बल नऊ तास नॉनस्टॉप रंगलेला हा सोहळा इतका भन्नाट आणि थरारक होता की क्रीडाप्रेमी आपली तहान भूक विसरून गेले. प्राथमिक पेरीत निवडलेल्या दहा खेळाडूंमधून पाच खेळाडूंची निवड करताना जजेसची प्रत्येक गटात पंचाईत झाली. 55 किलो वजनी गटात जे.जे. चक्रवर्तीने निर्वीवाद यश मिळवले. 60 किलो वजनी गटात रेल्वेच्या हरी बाबूचा कडवा प्रतिकार मोडत काढत महाराष्ट्राने आपले खाते उघडले. 65, 70 आणि75  किलो गटात रेल्वेच्या एस. भास्करन , अनास हुसेन आणि व्ही. जयप्रकाशला पर्याय नव्हता. या तिघांनी आपापल्या गटात जबरदस्त पीळदार देहाचे प्रदर्शन करीत अन्य खेळाडूंना अव्वल स्थानाच्या आसपासही भटकू दिले नाही. 80 किलो गटातही रेल्वेचा सर्बो सिंगच सरस ठरतो की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता,पण कंपेरिझन मध्ये सागर कातुर्डेने बाजी मारली. 85किलोच्या गटात दिल्लीचा नरेंदर यादवने अव्वल स्थान पटकावले.

सुनीत जाधवच्या 90 किलो वजनी गटात कुणाचाच निभाव लगला नाही.महेंद्र चव्हाणने दुसरा तर रिजू पॉल जोसने तिसरा स्थान मिळवला. स्पर्धेतील सर्वात तगड्या गटात राम निवासने महेंद्र पगडेला मागे टाकत सोनेरी यश संपादले. सर्वात मोठ्या गटातही अनुज कुमारला उत्तर नव्हते आणि त्याने अव्वल स्थान संपादले.

भारत श्री 2018 राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा निकाल

महिला शरीरसौष्ठव - 1 - कांची आडवाणी (महाराष्ट्र अ), 2 - ममता देवी यमनम (दिल्ली), 3 - गीता सैनी (हरयाणा),  4 -जमुना देवी (मणिपूर),  सरिता देवी (मणिपूर).

महिला स्पोर्टस् मॉडेल - 1 - संजू (उत्तर प्रदेश), 2 -सोनिया मित्रा (प. बंगाल), 3 - अंकिता सिंग (कर्नाटक), 4 - स्टेला गोडे (महाराष्ट्र अ),  5 - मंजिरी भावसार(महाराष्ट्र अ).

फिजीक स्पोर्टस् ( पुरूष) - 1 -चेतन सैनी ( चंदीगड), 2 - किरण साठे (महाराष्ट्र), 3 - रोहन पाटणकर (महाराष्ट्र), 4 -वेस्ली मेनन (प. बंगाल), 5. अनिल सती(उत्तर प्रदेश).

पुरुष शरीरसौष्ठव

55 किलो वजनी गट  - 1 - जे.जे. चकवर्ती (रेल्वे), 2 - सोनू (दिल्ली), 3 - पुंदनकुमार गोपे (रेल्वे),  4 - एल. नेता सिंग (मणिपूर), 5 - व्ही. आरिफ (केरळ).

60 किलो वजनी गट  -  1 - नितीन म्हात्रे (महाराष्ट्र अ), 2 - के. हरीबाबू (रेल्वे), 3 - प्रतीक पांचाळ (महाराष्ट्र ब),  4 - अंकूर (दिल्ली), 5 -दिपू दत्ता (आसाम).

65 किलो वजनी गट  - 1 - एस. भास्करन (रेल्वे), 2 -अनिल गोचीकर (ओडिशा), 3 - मित्तलकुमार सिंग(दिल्ली), 4 - टी. कृष्णा (मध्य प्रदेश), 5 - रियाज टी.के.(केरळ) 

70 किलो वजनी गट  -1 -अनास हुसेन (रेल्वे), 2 - हिरालाल (पंजाब पोलीस), 3 - राजू खान (दिल्ली), 4 -धर्मेंदर सिंग (दिल्ली), 5 - हरिश्चंद्र इंगावले (पुद्दुचेरी).

75 किलो वजनी गट  - 1 - व्ही. जयप्रकाश (रेल्वे), 2 - मोहम्मद सद्दाम (उत्तर प्रदेश), 3 -  सुशील मुरकर(महाराष्ट्र ब), 4 - प्रवीण कंबारकर (कर्नाटक), 5. राजीव साहू (मध्य प्रदेश).

80 किलो वजनी गट - 1. सागर कातुर्डे (महाराष्ट्र), 2.एन. सर्बो सिंग (रेल्वे), 3. बी. महेश्वरन (तामीळनाडू), 4.रविंदर मलिक (गुजरात), 5. राज चौधरी (उत्तर प्रदेश).

85 किलो वजनी गट - -1. नरेंदर यादव (दिल्ली), 2.प्रीतम चौगुले (रेल्वे), 3. ए. बॉबी सिंग (रेल्वे), 4. आय. देवा सिंग (मध्य प्रदेश), 5. मिथुन साहा (प.बंगाल).

90 किलो वजनी गट - 1. सुनीत जाधव (महाराष्ट्र), 2.महेंद्र चव्हाण ( महाराष्ट्र), 3. रिजू पॉल जोस (गुजरात), 4. सागर जाधव (रेल्वे), 5. रोहित शेट्टी (महाराष्ट्र),

90-100 किलो वजनी गट -  1. राम निवास (रेल्वे), 2.महेंद्र पगडे (महाराष्ट्र), 3. एस. सेंथिल कुमारन(तामीळनाडू), 4. अमित छेत्री (उत्तराखंड),  5. समीर खान (मध्य प्रदेश)

100 किलोवरील गट - 1.  अनुज कुमार (उत्तर प्रदेश), 2. जावेद अली खान (रेल्वे), 3,  अतुल आंब्रे (महाराष्ट्र), 4. अक्षय मोगरकर (महाराष्ट्र), नितीन बाबू ( गुजरात).

सांघिक उपविजेतेपद - महाराष्ट्र (60 गुण)

सांघिक  विजेतेपद -  रेल्वे (87 गुण)

बेस्ट पोझर - एन. सर्बो सिंग (रेल्वे)

सर्वोत्कृष्ठ प्रगतीकारक खेळाडू ः अनुज कुमार (उत्तर प्रदेश)

तृतीय क्रमांक - नरेंदर यादव ( दिल्ली)

द्वितीय क्रमांक -  सुनीत जाधव (महाराष्ट्र)

भारत श्री किताब विजेता - राम निवास (रेल्वे)

टॅग्स :Sportsक्रीडाbodybuildingशरीरसौष्ठवIndiaभारत