आर श्रीधर होणार भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक

By Admin | Updated: September 13, 2016 21:44 IST2016-09-13T21:31:17+5:302016-09-13T21:44:15+5:30

माजी क्रिकेटपटू आर श्रीधर यांची न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून पुन्हा निवड

R Sridhar will be the fielder coach of the Indian team | आर श्रीधर होणार भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक

आर श्रीधर होणार भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली,दि.13- माजी क्रिकेटपटू आर श्रीधर यांची न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून पुन्हा निवड होण्याची दाट शक्‍यता आहे. 
 
श्रीधर हे सध्या भारत ‘अ‘ संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक असून  न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर येथील पहिल्या कसोटीपूर्वी ते अभय शर्मांची जागा घेतील. भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे हे श्रीधर यांच्या नियुक्तीसाठी आग्रही होते.  
 
ट्‌वेंटी-20 विश्‍वचषक स्पर्धेनंतर श्रीधर यांचा भारतीय संघाबरोबर असलेला करार संपुष्टात आला होता.फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संजय बांगर हेच कायम असणार आहेत.  
 

Web Title: R Sridhar will be the fielder coach of the Indian team