शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबचा ‘सुपर’ विजय

By admin | Updated: April 22, 2015 03:54 IST

आयपीएलमधील रोमांच दिवसेंदिवस टीपेला पोहचत असून राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात आज येथे झालेला सामना सुपर ओव्हरमध्ये

अहमदाबाद : आयपीएलमधील रोमांच दिवसेंदिवस टीपेला पोहचत असून राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात आज येथे झालेला सामना सुपर ओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने जिंकत राजस्थानच्या विजयी अभियानाला ब्रेक लावला. निर्धारीत षटकात प्रथम फलंदाची करताना राजस्थान रॉयल्सने ६ बाद १९१ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना किंग्ज इलेव्हन पंजाबला शेवटच्या चेंडूवर ५ धावा हव्या होत्या, अक्षर पटेलने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकल्याने सामना टाय झाला. त्यानंतर झालेला सुपर ओव्हरचा थरार पंजाबने निर्विवादपणे जिंकला. सुपर ओव्हरमध्ये पंजाबने प्रथम खेळताना १५ धावा केल्या. पण राजस्थानचे सहा धावांत दोन फलंदाज बाद झाल्याने पंजाबने बाजी मारली. राजस्थानचे १९१ धावांचे आव्हान पेलताना पंजाबच्या शॉन मार्श (६५) आणि डेव्हीड मिलर (५४) यांनी चांगली फलंदाजी केली. विशेषत: मिलरच्या ३0 चेंडूतील ५४ धावांमुळे विजय आवाक्यात आला पण निर्णायक क्षणी तो बाद झाला. शेवटच्या षटकात विजयासाठी १४ धावांची आवश्यकता असताना मिशेल जॉन्सन - अक्षर पटेल यांनी १३ धावा केल्या. अक्षर पटेलने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकल्याने सामना टाय झाला. तत्पूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्त्व करणाऱ्या वीरेंद्र सेहवागने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजीस पाचारण केले. अजिंक्य रहाणे (७४) आणि शेन वॉटसन (४५) यांनी दिलेल्या ९५ धावांच्या सलामीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबला १९२ धावांचे टार्गेट दिले. राजस्थानने आपल्या डावात ६ बाद १९१ धावा केल्या.सरदार पटेल स्टेडियमच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा आघाडी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि कर्णधार शेन वॉटसन यांनी किंग्जच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी ४२ चेंडूत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. दोघांची भागीदारी शतकाकडे चालली असताना अक्षर पटेलने ही जोडी फोडली. वॉटसन पुढे सरसावून फटका मारण्याच्या नादात यष्टीचित झाला. त्याने ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार ठोकून ४५ धावा केल्या.सध्या आॅरेंज कॅप डोक्यावर मिरवणाऱ्या अजिंक्यने आजही शानदार फलंदाजी केली. त्याने ५४ चेंडूंत सहा चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ७४ धाावा केल्या. जॉन्सनच्या फसव्या स्लोअरवनवर यष्टीरक्षक वृध्दीमान सहाकडे झेल देवून रहाणे बाद झाला. दिपक हुडाने ९ चेंडूत झटपट १९ धावा केल्या. स्टीव्हन स्मिथला अक्षरने शुन्यावर मॅक्सवेलकरवी झेलबाद केले. रहाणे बाद झाल्यावर मात्र राजस्थानच्या धावांचा ओघ आटला. त्यांचा डाव ६ बाद १९१ वर येवून थांबला.तत्पूर्वी, सरदार पटेल स्टेडियमच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा आघाडी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि कर्णधार शेन वॉटसन यांनी किंग्जच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेत ९५ धावांची दमदार सलामी दिली. अजिंक्य व वॉटसनने ४२ चेंडंूत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. दोघांची भागीदारी शतकाकडे चालली असताना अक्षर पटेलने ही जोडी फोडली. वॉटसन पुढे सरसावून फटका मारण्याच्या नादात यष्टीचित झाला. त्याने ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार ठोकून ४५ धावा केल्या. अजिंक्यने आजही शानदार फलंदाजी केली. त्याने ५४ चेंडूंत सहा चौकार आणि २ षटकारांच्या साह्याने ७४ धाावा केल्या. जॉन्सनच्या फसव्या स्लोअरवनवर यष्टीरक्षक वृद्धिमान साहाकडे झेल देऊन रहाणे बाद झाला. रहाणे बाद झाल्यावर त्यांचा फॉल्कनर (१) व नायर (२५) लवकर बाद झाले. शेवटी बिन्नी १२ आणि सॅमसन ५ धावांवर नाबाद राहिले. (वृत्तसंस्था)