शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे खेळपट्टी खराब : ब्रॉड

By admin | Updated: March 1, 2017 00:09 IST

आयसीसी मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पुणे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीला ‘खराब’ मानांकन दिले आहे.

नवी दिल्ली : आयसीसी मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पुणे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीला ‘खराब’ मानांकन दिले आहे. येथे पाहुण्या संघाने तीन दिवसांमध्ये विजय साकारला होता.आयसीसीने स्पष्ट केले की, हा अहवाल बीसीसीआयला पाठविण्यात आला असून त्यांना उत्तर देण्यासाठी १४ दिवसांचा कलावधी देण्यात आला आहे. मालिकेतील पहिल्या लढतीचा निकाल अपेक्षेनुसार नव्हता. त्यात आॅस्ट्रेलियाने भारताचा ३३३ धावांनी पराभव करीत यजमान संघाची १९ सामन्यांपासून अपराजित राहण्याची मालिका खंडित केली. आयसीसीने म्हटले आहे की, ‘आयसीसी खेळपट्टी व बाह्य मैदान यावर लक्ष ठेवण्याच्या नियम ३ च्या अंतर्गत ब्रॉड यांनी आापला अहवाल आयसीसीला सोपविला आहे. त्यात खेळपट्टीच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.’ बीसीसीआयच्या उत्तराची समीक्षा आयसीसीचे क्रिकेट महाव्यवस्थापकज्योफ अलार्डिस व आयसीसी मॅच रेफ्री एलिट पॅनलचे रंजन मदुगले करतील. मॅच रेफ्रीने भारतातील खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित करण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. डिसेंबर २०१५ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीलाही मॅच रेफ्रीने खराब असल्याचा शेरा दिला होता. त्या वेळीही तीन दिवासांमध्ये सामना संपला होता आणि भारताने १२४ धावांनी विजय मिळवित चार सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली होती. >आयसीसी मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांचा शेरापुण्यातील खेळपट्टीवर चेंडू पहिल्या दिवसापासून वळत होता, पण येथे खेळणे अशक्य नव्हते. कारण, आॅस्ट्रेलिया दोन्ही डावांमध्ये २५० पेक्षा अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला. भारताला मात्र दोन्ही डावांत एकूण ७४ षटकेही फलंदाजी करता आली नाही.