शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुणे दुखापतीमुळे झाले ‘उणे’

By admin | Updated: May 2, 2016 22:33 IST

यंदाच्या मोसमातून आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या राइजिंग पुणे सुपरजायंट्सची निराशाजनक कामगिरी सुरु असतानाच त्यांना प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींचाही मोठा फटका बसला आहे.

स्टिव्ह स्मिथही जायबंदी : मायदेशी परतलामेलबोर्न : यंदाच्या मोसमातून आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या राइजिंग पुणे सुपरजायंट्सची निराशाजनक कामगिरी सुरु असतानाच त्यांना प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींचाही मोठा फटका बसला आहे. धडाकेबाज फाफ डू पेल्सिस, केविन पीटरसन आणि अष्टपैलू मिशेल मार्श दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर आता आॅस्टे्रलियाचा भरवाशाचा आणि सुपराजायंट्सच्या फलंदाजीचा आधारस्तंभ असलेला स्टिव्ह स्मिथही मनगटाच्या दुखापतीमुळे मायदेशी रवाना झाला आहे. एकूण चार प्रमुख खेळाडू एकाचवेळी जायबंदी झाल्याने पुणेकर एकाकी दुबळे भासू लागले आहेत.कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळत असलेल्या या संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत आपल्या आठ सामन्यांतून सहा सामने गमावले असून केवळ दोन सामने जिंकले आहेत. मात्र, प्रमुख खेळाडूंच्या दुखापती ही सध्या पुणे संघासाठी सर्वात चिंतेची बाब आहे. पीटरसन, प्लेसिस आणि मार्श यांच्यानंतर स्मिथही दुखापतग्रस्त झाल्याने उर्वरीत आयपीएल सामन्यात तो खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आधीच पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पुणेकरांसमोर विजयी मार्गावर येण्याचे खडतर आव्हान असेल.आॅस्टे्रलियाचे स्पोटर््स सायन्स मॅनेजर अ‍ॅलेक्स काऊंटूरिस यांनी सांगितले की, ‘‘स्टिव्हच्या उजव्या मनगटाता गेल्या आठवड्यात दुखापत झाली होती. आम्ही आयपीएलमध्ये पुणे संघासह त्याच्या दुखापतीसंबंधी संपर्कात होतो आणि दुर्देवाने त्याची दुखापती ठिक होऊ शकली नाही. त्यामुळे तो लवकर मायदेशी परतत असून ज्याद्वारे वेस्ट इंडिज दौऱ्यापुर्वी त्याच्या दुखापतीचे योग्य पध्दतीने परिक्षण करता येईल.’’‘‘सध्या मिळालेल्या माहितीनुसार स्टिव्हची दुखापत गंभीर आहे. त्यामुळे त्याला यातून सावरण्यासाठी आम्हाला अधिक वेळ देणे गरजेचे आहे. त्याला अधिक वेळ मिळाल्यास विंडिज दौऱ्यासाठी तो उपलब्ध असेल. स्टिव्हने दुखापत असतानाही आयपीएलमध्ये आपल्या पुणे संघासाठी एकही सामना सोडला नाही आणि अन्य बलाढ्य खेळाडूंच्या अनुपस्थित मैदानात उतरताना एक शतकही ठोकले,’’ असेही अ‍ॅलेक्स यांनी सांगितले.दरम्यान, पुणे संघात आता मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून पीटरसन व प्लेसिसच्या जागेवर निवड झालेला आॅस्टे्रलियाचा आक्रमक सलामीवीर उस्मान ख्वाजाला संधी मिळू शकते. त्याचवेळी मार्शच्या जागी नवीन खेळाडू म्हणून अद्याप कोणाचे नाव पुढे आलेले नाही. (वृत्तसंस्था)