शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कसोटी क्रमवारीत पुजारा, विराटची घसरण

By admin | Updated: August 3, 2014 00:53 IST

कसोटी रँकिंग : अजिंक्य रहाणेची ९ स्थानांनी झेप

कसोटी रँकिंग : अजिंक्य रहाणेची ९ स्थानांनी झेपग्लास्गो : फलंदाजीत सुमार कामगिरी करणारा युवा भारतीय फलंदाज विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांची इंग्लंडविरुद्ध तिसर्‍या साउथम्पटन कसोटीनंतर शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आयसीसी क्रमवारीत घसरण झाली आहे.भारताला इंग्लंडविरुद्ध तिसर्‍या कसोटीत २६६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दोन्ही संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ असे बरोबरीत आले आहेत. आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पुजारा दोन क्रमांकांनी घसरून तो १० व्या स्थानावर, तर विराटची एका स्थानाने घसरण होऊन तो १५ व्या क्रमांकावर आला आहे.तथापि, मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेला त्याच्या कामगिरीचा क्रमवारीत लाभ झाला असून त्याने ९ स्थानांनी झेप घेतली असून तो कारकीर्दीतील सवार्ेत्तम अशा २६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. रहाणेने या कसोटीत ५४ आणि नाबाद ५२ धावांची खेळी केली होती.गोलंदाजी रँकिंगमध्ये भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर यांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. जडेजाने तीन स्थानांनी प्रगती केली असून तो श्रीलंकेच्या शमिंडा इरंगा याच्याबरोबर संयुक्तरीत्या २५ व्या स्थानावर पोहोचला आहे. भुवनेश्वर कुमारलाही दोन स्थानांनी लाभ होऊन तो ३२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. कसोटी गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेचा तेजतर्रार गोलंदाज डेल स्टेन अव्वल स्थानी आहे.कसोटी फलंदाजांत दक्षिण आफ्रिकेचा ॲबी डिव्हिलियर्स सर्वाधिक ८९९ रेटिंग गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे, तर त्याचा संघ सहकारी हाशिम आमलाचे अव्वल तीन मध्ये पुनरागमन झाले आहे. आमलाने श्रीलंकेविरुद्ध कोलंबोत नाबाद १३९ आणि २५ धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याला रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. त्याला या कामगिरीमुळे ३४ रेटिंग गुणांचा लाभ झाला आहे.इंग्लंडमध्ये भारताविरुद्ध विद्यमान कसोटी मालिकेत पहिला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा इयान बेल यालादेखील रँकिंगमध्ये पाच स्थानांचा फायदा झाला आहे. त्याने केलेल्या १६७ धावांच्या खेळीमुळे तो टॉप २० फलंदाजांत तो १९ व्या स्थानावर पोहोचला आहे. गॅरी बॅलेन्सने १५६ धावांच्या खेळीच्या बळावर १६ स्थानांनी झेप घेतली असून तो सवार्ेत्तम रँकिंगसह ३१ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गत कसोटीत ७० धावांची खेळी करणारा इंग्लंडचा कर्णधार ॲलेस्टर कुकने सात क्रमांकांनी झेप घेतली असून तो २२ व्या स्थानावर पोहोचला आहे.