शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

Pro Kabaddi League 2022 : प्रदीप नरवालची ऐतिहासिक कामगिरी, PKLच्या इतिहासात याआधी नोंदवला नाही गेला असा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 9:55 PM

Pro Kabaddi League 2022 : प्रो कबड्डी लीगच्या आजच्या सामन्यात यू मुंबा आणि हरयाणा स्टीलर्स यांच्यातला सामना बरोबरीत सुटला, तर तामिळ थलायव्हाजनं चुरशीच्या सामन्यात यूपी योद्धाचा पराभव केला.

Pro Kabaddi League 2022 : प्रो कबड्डी लीगच्या आजच्या सामन्यात यू मुंबा ( U Mumba) आणि हरयाणा स्टीलर्स ( Haryana Steelers) यांच्यातला सामना बरोबरीत सुटला, तर तामिळ थलायव्हाज ( Tamil Thalaivas) नं चुरशीच्या सामन्यात यूपी योद्धा ( UP Yoddha) संघाचा पराभव केला. पण, आजचा दिवस प्रदीप नरवालचा ( Pradeep Narwal) राहिला. त्यानं PKL च्या इतिहासात विक्रमाची नोंद केली. यूपी योद्धाच्या या खेळाडूनं असा पराक्रम केला जो आजपर्यंत कोणालाही करता आलेला नाही.

आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात हरयाणानं पहिल्या हाफमध्ये १२-१० अशी आघाडी घेऊनही यू मुंबानं त्यांना २४-२४ असे बरोबरीत रोखले. हरयाणाचा रोहित गुलीयानं सर्वाधिक ८ गुण कमावले, तर कर्णधार विकास कंडोलानं ५ गुणांची कमाई केली. यू मुंबाकडून अभिषेक सिंगनं ४ गुण कमावले.  तामिळ थलायव्हाजनं पहिल्या हाफमध्ये २१-१० अशी आघाडी घेऊन सामन्याचा निकाल एकतर्फी लागेल असे संकेत दिले होते. पण, यूपी योद्धाकडून दुसऱ्या सत्रात दमदार खेळ झाला. सामना संपायला काही मिनिटांचा खेळ असताना ३५-३५ अशी बरोबरी त्यांनी मिळवली होती. यूपी योद्धाच्या सुरेंदर गिलनं एकहाती संघर्ष करताना १४ गुण घेतले, पण तामिळ थलायव्हाजच्या सांघिक खेळासमोर त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. मनजीत, सुरजीत सिंग, के. प्रपंजन, भवानी राजपूत, सागर, अजिंक्य पवार यांनी अफलातून कामगिरी करताना तामिळ थलायव्हाजचा ३९-१५ असा विजय पक्का केला.  या सामन्यात प्रदीप नरवालनं ६ गुणांची कमाई करून इतिहास रचला. प्रो कबड्डी लीगमध्ये १२०० गुणांचा पल्ला ओलांडणारा तो पहिला खेळाडू ठरला. प्रदीपच्या नावावर १२०१ गुण झाले आहेत. त्यानंतर राहुल चौधरी ( ९६४), दीपक हुडा ( ८८८), मनिंदर सिंग ( ८०३) व अजय ठाकूर ( ७९१) यांचा क्रमांक येतो. 

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डीU Mumbaयू मुंबाUP Yoddhaयूपी योद्धा