शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

मेनलॅन्ड ते  अँनाकापा पोहणारा प्रभात ठरला पहिला आशियाई जलतरणपटू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 22:18 IST

२० किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरीत्या पोहून पार करणारा मुंबईकर प्रभात कोळी हा आशिया आणि भारतातील पहिला जलतरणपटू ठरला आहे.

मुंबई : कॅलिफोर्नियातील सांताबारबारा येथील मेनलॅन्ड ते अँनाकापा हे प्रशांत महासागरातील २० किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरीत्या पोहून पार करणारा मुंबईकर प्रभात कोळी हा आशिया आणि भारतातील पहिला जलतरणपटू ठरला आहे. आतापर्यँत जगभरातील केवळ १४ जलतरणपटूनी अशी कामगिरी साधली आहे. चेंबूरच्या बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या प्रभातने सातव्या क्रमांकाची वेळ  नोंदवली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेकरता प्रशांत महासागरात सराव करत असताना प्रभातचा डावा खांदा दुखावला होता. पण या दुखण्यावर मात करत प्रभातने यशावर शिक्कमोर्तब केले.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ३ जुलै रोजी प्रभातने अँनाकापा ते मेनलॅन्ड हे २० किलोमीटरचे अंतर पोहण्यास सुरुवात केली. पण या मार्गात असलेल्या तेलाच्या विहरीतील निघालेला तेलाचा तवंग पाण्यावर पसरला होता. सुमारे ८ किलोमीटरचे अंतर पोहून गेल्यावर पाण्यावर पसरलेल्या तेलाचा प्रभातला खूप त्रास झाला. पोहत असताना अवघ्या १५ मिनिटाच्या कालावधीत प्रभातला वारंवार उलट्या  होऊ लागल्या. त्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी प्रभातने पाण्याबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या अपयशामुळे नाउमेद न होता १० जुलै रोजी प्रभात मेनलॅन्ड ते अँनाकापा हे उलट अंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरला आणि त्यात यशही मिळवले. यावेळी पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला लागल्याने प्रभातला अपेक्षित वेळ साधता आली नाही. साधरणतः; चार फुटाची लाट  आणि  १३ अंश सेल्सिअस पाण्याचे तापमान असताना प्रभातने २० किलोमीटरचे अंतर ६ तास २० मिनिटामध्ये पोहून पार केले. 

या यशानंतर कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन मिळवण्यासाठी आवश्यक असणारा लेक तहाउमध्ये पोहण्यासाठी प्रभात १७ जुलै रोजी पाण्यात उतरला. कॅलिफोर्नियातील सुमारे २००० मीटर उंचीवर आणि पाण्याचे तापमान ११ अंश सेल्सिअस असतानाही प्रभातने निर्धाराने ३५ किलोमीटरचे अंतर पोहण्यास सुरुवात केली. पण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केल्यावर प्रभातच्या खांद्याच्या दुखण्याने उचल खाल्ली. तरीसुद्धा प्रभातने नेटाने पोहणे  चालूच ठेवले. पण शेवटच्या टप्प्यात वेदना असह्य झाल्याने दुखणे आणखी वाढू नये म्हणून प्रभातने यश समोर दिसत असतानाही माघार घेतली. या दुखण्यावर योग्य ते उपचार घेतल्यावर पुढील वर्षी प्रभात पुन्हा एकदा पोहण्यासाठी लेक तहाउमध्ये उतरणार आहे. 

इंग्लंडच्या मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायर किताबाच्या मानकरी असलेल्या सॅलीमेंटी ग्रॅव्हीट यांच्या मार्गदर्शानुसार सराव करणाऱ्या प्रभातने दीर्घ पल्ल्याच्या जलतरणात चांगलीच छाप पाडली आहे. खुल्या पाण्यातील जलतरणात तिहेरी यश संपादन करणारा प्रभात आशियातील सर्वात युवा जलतरणपटू आहे.हवाई बेटावरील कैवी चॅनेल जलदरीत्या पोहणारा प्रभात आशियातील सर्वात युवा जलतरणपटू आहे.  दक्षिण आफ्रिकेतील अटलांटिक महासागरही जलदरीत्या पोहण्याची कामगिरी प्रभातने साधली आहे. इंग्लंडमधील नॉर्थ आयर्लंड येथील नॉर्थ चॅनेल आणि जपानमधील त्सुगुरु  चॅनेल   पोहणारा प्रभात आशियातील युवा जलतरणपटू आहे.

टॅग्स :SwimmingपोहणेMaharashtraमहाराष्ट्र