शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

पोर्तुगालपुढे क्रोएशियाचे आव्हान

By admin | Updated: June 25, 2016 02:41 IST

मोक्याच्यावेळी फॉर्ममध्ये आलेल्या स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने पोर्तुगालला युरो कप स्पर्धेबाहेर जाण्यापासून वाचविले खरे; मात्र अव्वल १६ संघांतून आगेकूच करण्यासाठी आता

लेन्स (फ्रान्स) : मोक्याच्यावेळी फॉर्ममध्ये आलेल्या स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने पोर्तुगालला युरो कप स्पर्धेबाहेर जाण्यापासून वाचविले खरे; मात्र अव्वल १६ संघांतून आगेकूच करण्यासाठी आता त्यांच्यासमोर आव्हान असेल ते झुंजार क्रोएशियाचे. विशेष म्हणजे या संघाला पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांनी ‘शार्क’ असे म्हटले असल्याने, या शार्कची शिकार करण्यात पोर्तुगालला यश येते की नाही याकडे सर्व फुटबॉलप्रेमींची उत्सुकता लागली आहे.हंगेरीविरुद्ध झालेल्या ३-३ अशा शानदार बरोबरीमध्ये रोनाल्डो याने दमदार दोन गोल करताना पोर्तुगालसाठी निर्णायक कामगिरी केली होती. दखल घेण्याची बाब म्हणजे यासह चार युरोपियन चॅम्पियनशीप स्पर्धेत गोल करणारा पहिलावहिला खेळाडूचा मानही रोनाल्डोने मिळविला. या बरोबरीच्या जोरावर ‘फ’ गटातून आइसलँड आणि हंगेरी नंतर तृतीय स्थानी राहताना पोर्तुगालने उप-उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश मिळविले. त्याचवेळी दुसरीकडे क्रोएशिया पोर्तुगालला धक्का देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. शनिवारी होणाऱ्या या लढतीसाठी रियल माद्रिदचा रोनाल्डोचा सहकारी लुका मोडरिचदेखील पुनरागमन करणार असल्याने पोर्तुगालपुढे त्याचे विशेष आव्हान असेल. दुखापतीमुळे मोडरिच स्पेनविरुद्ध खेळू शकला नव्हता. (वृत्तसंस्था)आम्ही अंतिम १६ संघांत स्थान मिळविले असून, आमचा संघ खूप चांगला आहे. ही लढत नक्कीच तुल्यबळ असेल. क्रोएशिया एक मजबूत संघ आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू असून, प्रत्येक संघ स्पेनला हरवू शकत नाही. आम्ही त्यांचा आदर करतो; पण आम्हालाही आमची ताकद माहीत आहे. - ख्रिस्तियानो रोनाल्डोक्रोएशियाचा संघ एक शार्क आहे आणि त्यांच्यापासून आम्हाला सतर्क राहावे लागेल. स्पेनसारखा संघ गटात असतानाही त्यांनी गटात अव्वल स्थान पटकावले यावरूनच सर्वकाही स्पष्ट होते.- फर्नांडो सांतोस, प्रशिक्षक, पोर्तुगाल