शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

पूजा घाटकरला १० मीटर एअर रायफलचे कांस्य

By admin | Updated: February 24, 2017 17:39 IST

सुरुवातीच्या तांत्रिक अडचणींवर मात करीत पूजा घाटकरने येथील डॉ. कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये शुक्रवारी सुरू झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्याच

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - सुरुवातीच्या तांत्रिक अडचणींवर मात करीत पूजा घाटकरने येथील डॉ. कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये शुक्रवारी सुरू झालेल्या  विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकून ददिले.
माजी आशियाई चॅम्पियन असलेल्या २८ वर्षांच्या पूजाने २२८.८ गुणांसह कांस्य जिंकले. चीनच्या मेंगयावो शी हिने २५२.१ गुणांसह सुवर्ण जिंकून नवा विश्वविक्रम नोंदविला. तिची सहकारी डोंलिजी हिने २४८.९ गुणांसह रौप्यपदक पटकविले. मागच्यावर्षी रिओ आॅलिम्पिकचा कोटा मिळविण्यात थोड्या फरकाने वंचित राहिलेल्या पूजाने सुरुवातीला तांत्रिक चुका केल्या पण लगेच सावरत पहिल्या फेरीत ती दुसºया स्थानावर राहिली. अंतिम फेरीत लिजीकडून कडवे आव्हान मिळाल्यानंतरही फायनलदरम्यान पूजाच्या बंदूकचे ब्लार्इंडर पडले. तरीही अखेरचे काही शॉट तिने डोळे बंद करीत मारले . त्याआधी पात्रता फेरीत पूजाला ४१८ आणि मेंगयाओला ४१८.६ तर लिजीला ४१७.७ गुण मिळाले होते.
 
पदकाचे श्रेय नारंगला -  पूजा
कांस्य विजेती पूजा घाटकर हिने विश्वचषक स्पर्धेत जिंकलेल्या कांस्यपदकाचे श्रेय कोच आणि आॅलिम्पिक नेमबाज गगन नारंग याला दिले. नारंगने माझे करियर घडविण्यात मोलाची मदत केल्याचे पूजाने विजयानंतर सांगितले. पूजाची कामगिरी पाहण्यासाठी नारंग स्वत: प्रेक्षकांत उपस्थित होता. पूजा म्हणाली,‘मी योजना आखली नव्हती. पण गगनने मला मानसिक आणि तांत्रिक बळ दिले. काल त्याने मला जे मार्गदर्शन केले त्यानुसारच आज काम केल्याने मला यश लाभले आहे. यावेळी गगन म्हणाला,‘पूजाने प्रशिक्षणासाठी मला काहीसे ब्लॅकमेल केले होते. तिला पात्रता फेरीत यश यायचे पण फायनलमध्ये अपयशाचा सामना करावा लागायचा. त्यावर तोडगा काढला. डावपेच आखून लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरलो.’