शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

पॉली उम्रीगर पुरस्कार विराट कोहलीला जाहीर

By admin | Updated: March 2, 2017 00:14 IST

भारताचा कर्णधार विराट कोहली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड केली.

पॉली उम्रीगर पुरस्कार विराट कोहलीला जाहीरमुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड केली. त्याच वेळी स्टार अष्ट्रपैलू रविचंद्रन आश्विनची दिलीप सरदेसाई पुरस्कारासाठी निवड झाली. ८ मार्चला बंगळुरू येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यामध्ये या दोन्ही खेळाडूंना गौरविण्यात येईल. विशेष म्हणजे, याआधी दोन वेळा कोहलीने सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला आहे. २०११-१२ आणि २०१४-१५ या मोसमात हा पुरस्कार पटकावल्यानंतर तिसऱ्यांदा कोहली बीसीसायचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावेल. विशेष म्हणजे तीन वेळा या पुरस्कारावर नाव कोरणारा कोहली पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल. दुसरीकडे, दिलीप सरदेसाई पुरस्कार दोन वेळा जिंकणारा आश्विनदेखील पहिलाच भारतीय ठरणार आहे. याआधी २०११ मध्ये भारत-वेस्ट इंडिज तीन सामन्यांच्या मालिकेत मालिकावीर ठरत पहिल्यांदा हा पुरस्कार पटकावला होता. यानंतर आश्विनने आपला धडाकाच लावला. त्याने गेल्याच वर्षी झालेल्या चार सामन्यांच्या मालिकेत पुन्हा मालिकावीराचा मान मिळवला. त्यात त्याने दोन शतकांसह १७ बळी मिळवताना दोन वेळा एकाच डावात पाच बळी मिळवण्याचा पराक्रम केला. त्याच वेळी एम. राम, रामचंद्र गुहा आणि डायना एडलजी यांचा समावेश असलेल्या बीसीसीआय वार्षिक पुरस्कार समितीने राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर यांची सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली. (क्रीडा प्रतिनिधी)>मुंबई क्रिकेट संघ सर्वोत्तमगतमोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकरांचा बोलबाला राहिला. विक्रमी ४१ व्यांदा रणजी करंडक पटकावल्यानंतर सीके नायडू ट्रॉफी आणि महिला प्लेट लीग गटातही मुंबईकरांचे वर्चस्व राहिले. तसेच, कुचबिहार ट्रॉफी, विजय मर्चंट ट्रॉफी आणि महिला एकदिवसीय एलिट गटामध्ये मुंबईकरांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या धडाक्याच्या जोरावर मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) मोसमातील सर्वोत्तम राज्य संघटना म्हणून निवड झाली.