शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंच्या पोशाखाची घोषणा गुलदस्त्यात

By admin | Updated: May 29, 2016 00:17 IST

रिओ आॅलिम्पिकचे आयोजन आगामी ५ आॅगस्टपासून होत आहे. त्यासाठी अनेक देशांनी आपल्या पथकाच्या अधिकृत पोशाखाची घोषणा देखील केली. पण भारतीय पथकाच्या अधिकृत

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकचे आयोजन आगामी ५ आॅगस्टपासून होत आहे. त्यासाठी अनेक देशांनी आपल्या पथकाच्या अधिकृत पोशाखाची घोषणा देखील केली. पण भारतीय पथकाच्या अधिकृत पोशाखाचा अद्याप पत्ता नाही. हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.भारतीय आॅलिम्पिक संघटनेला लिहिलेल्या पत्रात भारतीय खेळाडूंच्या पोशाखाचा मुद्दा बत्रा यांनी उपस्थित केला असून मार्चपास्टच्यावेळी भारतीय खेळाडूंना ड्रेस देण्याचा निर्णय घेण्यात आला की नाही, अशी विचारणा केली. या पत्रात बत्रा पुढे म्हणतात,‘आॅलिम्पिकला आता ६८ दिवस उरले आहेत. भारतीय हॉकी संघ रिओला चार आठवडे आधीच अर्थात आॅलिम्पिक सुरू होण्याच्या २८ दिवस आधीच पोहोचेल. हॉकीपटूंना अधिकृत ड्रेस मिळण्यास ४० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या ४० दिवसांत महिला हॉकी संघ भारताबाहेरच दौऱ्यावर असेल. पुरुष व महिला हॉकी संघाला आयओए लवकर अधिकृत ड्रेस देणार असेल तर फार बरे होईल. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही हॉकीपटूंसाठी सूट, शर्ट आणि औपचारिक जोडे तयार केले आहेत. हे साहित्य सर्वच खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला देण्यात आले. हॉकी इंडियाने स्वखर्चाने ही उपाययोजना केली आहे. हे साहित्य खेळाडूंना देण्यात आले असल्याने आयओएने ऐनवेळी ड्रेस दिला नाही तरी नामुष्की टाळण्यासाठी हा पर्यायी मार्ग निवडण्यात आला.’ बत्रा पुढे म्हणाले,‘आयओएत मतभेद असल्याने फाईल्स चेन्नई व दिल्लीत सारख्या प्रवास करीत असतात. पदाधिकारी एकत्र बसण्यास तयार नाहीत. आयओएने दिल्लीत एकत्र बैठक घेत सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत असा आयओएला माझा आग्रह आहे.’कठोर मेहनत घेत आॅलिम्पिकची पात्रता गाठणाऱ्या खेळाडूंच्या भावनांचा विचार करण्याची गरज व्यक्त करीत बत्रा म्हणाले,‘देशाची प्रतिष्ठा आणि खेळाडूंच्या भावनांचा आदर करीत एकमेकांमध्ये भांडत न बसता आॅलिम्पिक समितीने चोख काम करावे.’ खासगीतील कामे आॅगस्ट २०१६ पर्यंत दूर ठेवली जाऊ शकतात, असा आयओए पदाधिकाऱ्यांना टोला हाणून चांगल्या व सकारात्मक विचारामुळे देशहित साधले जाईल, अशी आशा बत्रा यांनी व्यक्त केली.(वृत्तसंस्था)