PKL 2019 : VIRAT KOHLI TO GRACE THE OPENING OF MUMBAI LEG OF PRO KABADDI  | PKL 2019 : मुंबई टप्प्यातील पहिल्या सामन्याला कॅप्टन विराट कोहलीची उपस्थिती
PKL 2019 : मुंबई टप्प्यातील पहिल्या सामन्याला कॅप्टन विराट कोहलीची उपस्थिती

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सीजनमधील हैदराबाद येथील पहिला टप्पा आज पूर्ण होईल. शनिवारपासून मुंबईच्या टप्प्याला सुरुवात होणार आहे आणि या टप्प्यातील पहिल्याच दिवशी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली कबड्डीच्या मैदानावर दिसणार आहे. यजमान यू मुंबा आणि पुणेरी पलटन या महाराष्ट्र डर्बीच्या सामन्यांन मुंबई लेगला सुरुवात होईल. यावेळी कोहली यू मुंबाला चिअर करताना दिसणार आहे. दुसऱ्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्स आणि बंगाल वॉरियर्स हे भिडतील.

हैदराबाद येथील टप्प्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यांत दबंग दिल्लीनं 10 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. यजमान तमीळ थलायव्हाजला दोन सामन्यांत एकच विजय मिळवता आला आहे आणि ते 6 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. बंगाल वॉरियर्स, जयपूर पिंक पँथर्स, गुजरात फॉर्च्युनजायंट्स, हरयाणा स्टीलर्स, यू मुंबा आणि बंगळुरू बुल्स यांच्या खात्यात प्रत्येकी पाच गुण आहेत. तेलुगू टायटन्स आणि माजी विजेता पाटणा पायरेस्ट यांनी अनुक्रमे 2 व 1 गुणाची कमाई केली आहे. पुणेरी पलटन व यूपी योद्धा यांना खाते उघडता आलेले नाही.

PKL 2019 : देसाई बंधूंची कमाल; सूरजनं पहिल्याच सामन्यात मोडला सिद्धार्थचा विक्रम

PKL 2019 : आई-वडिलांना वाटत होती 'वेगळीच' भीती, पण मराठमोळ्या वीराची कबड्डीत 'प्रो'गती!


 

English summary :
Pro Kabaddi: The first phase of the seventh season of the Pro Kabaddi League in Hyderabad will be completed today. Indian team captain Virat Kohli will be appearing on the kabaddi ground.The Mumbai leg will start with the matches of the U Mumba-Puneeri Paltan. This time, Virat Kohli will be seen cheering U Mumba.


Web Title: PKL 2019 : VIRAT KOHLI TO GRACE THE OPENING OF MUMBAI LEG OF PRO KABADDI 
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.