पिंकी राणीला कांस्य

By Admin | Updated: August 2, 2014 00:07 IST2014-08-02T00:07:25+5:302014-08-02T00:07:25+5:30

भारताच्या पिंकी राणीला २०व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्ध प्रकारात ४८ किलो गटात उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे कांस्य पदकावर समाधान मानावे लागले

Pinky queen bronze | पिंकी राणीला कांस्य

पिंकी राणीला कांस्य

ग्लास्गो : भारताच्या पिंकी राणीला २०व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्ध प्रकारात ४८ किलो गटात उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.हरियाना येथील सरसानाची २४ वर्षीय पिंकी उत्तर आयर्लंडच्या मिशेला वाल्शकडून ०-२ गुणांनी पराभूत झाली. उपांत्य फेरीतील प्रवेशाने पिंकीचे पदक आधीच निश्चित झाले होते.
वाल्शला तिन्ही पंचांनी ३८-३८, ४०-३६, ३९-३७ गुणांनी विजयी घोषित केले.भारताचे मुष्टियुद्धातील हे पहिले पदक आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Pinky queen bronze