शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

फिक्सिंग व भ्रष्टाचारामुळे आयपीएलमधून पेप्सीचे वॉकआऊट ?

By admin | Updated: October 9, 2015 14:53 IST

आयपीएलचे प्रायोजक पेप्सी पुढील हंगामापूर्वी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ९ - भ्रष्टाचार व फिक्सिंगच्या आरोपांचा सामना करणा-या इंडियन प्रीमियर लीगच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. आयपीएलचे मुख्य प्रायोजक पेप्सीने पुढील हंगामापूर्वी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पेप्सीने बीसीसीआयला नोटीस पाठवली आहे. 

पेप्सीने २०१३ ते २०१७ या कालावधीसाठी आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व स्वीकारले होते. यासाठी पेप्सीने तब्बल ३९६ कोटी रुपयेही मोजले होते. मात्र गेल्या दोन हंगामांपासून आयपीएलमध्ये फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येत असल्याने आता पेप्सीने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकऱणांमुळे आयपीएलची प्रतिमा डागाळली आहे अशी पेप्सीने नोटीसमध्ये म्हटले आहे. पेप्सीने आयपीएलचे सीईओ सुंदर रमण यांना आयपीएल २०१६ च्या हंगामाचे प्रायोजकत्व सोडत असल्याची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. रमण यांनी या संदर्भात बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी चर्चादेखील केल्याचे समजते.

पेप्सीने गेल्याच हंगामात आयपीएलमधून बाहेर पडण्याची तयारी केली होती. मात्र त्यावेळी बीसीसीआयने पेप्सीच्या अधिका-यांसोबत चर्चा करुन त्यांना रोखले होते. सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर बंदी टाकल्याने आधीपासूनच यंदाचा आयपीएलच्या हंगामाबाबत गोंधळाची स्थिती आहे.  १८ ऑक्टोबररोजी मुंबईत बीसीसीआयची बैठक होणार असून या बैठकीत पेप्सीच्या नोटीसवर चर्चा केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.