शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

आरसीबीला ‘पठाणी’ दणका

By admin | Updated: May 3, 2016 03:56 IST

युसूफ पठाण व आंद्रे रसेल यांनी मोक्याच्या वेळी केलेल्या जबरदस्त फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) ५ विकेटनी विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स

बंगळुरू : युसूफ पठाण व आंद्रे रसेल यांनी मोक्याच्या वेळी केलेल्या जबरदस्त फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) ५ विकेटनी विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (आरसीबी) हातातून सामना अक्षरश: हिसकावून घेतला. आरसीबीने दिलेल्या १८६ धावांचा पाठलाग करताना केकेआरने १९.१ षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात १८९ धावा काढल्या.एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून केकेआरने आरसीबीला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. लोकेश राहुल व कर्णधार विराट कोहली यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने ७ बाद १८५ धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा डाव ११व्या षटकात ४ बाद ६९, असा घसरला. कर्णधार गौतम गंभीर २९ चेंडूंत ३७ धावा काढून बाद झाल्यानंतर आरसीबी बाजी मारणार, असेच चित्र होते. मात्र, रसेल व पठाण यांनी आपला दांडपट्टा फिरवून सामन्याचे चित्र पालटले. रसेलने २४ चेंडूंत १ चौकार व ४ उत्तुंग षटकारांच्या साह्याने ३९ धावा कुटल्या. तर, पठाणने निर्णायक नाबाद अर्धशतक झळकावताना केवळ २९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा फटकावल्या. यजुवेंद्र चहलने टिच्चून मारा करताना २ बळी घेऊन केकेआरला जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला.तत्पूर्वी, राहुल व कोहली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने आव्हानात्मक मजल मारली. विध्वंसक ख्रिस गेल पुन्हा फेल ठरल्यानंतर या दोघांनी ८४ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. राहुलने ३२ चेंडंूत ६ चौकार व २ षटकारांसह ५२ धावा फटकावल्या. राहुलनंतर आलेला एबीही केवळ ४ धावा काढून परतला. कोहली ४४ चेंडूंत ४ चौकारांसह ५२ धावा काढून बाद झाला. तर, वॉटसनने २१ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ३४ धावा काढल्या.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : २० षटकांत ७ बाद १८५ धावा (लोकेश राहुल ५२, विराट कोहली ५२, शेन वॉटसन ३४; मॉर्नी मॉर्केल २/२८, पीयूष चावला २/३२) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १९.१ षटकांत ५ बाद १८९ धावा (युसूफ पठाण नाबाद ६०, आंद्रे रसेल ३९, गौतम गंभीर ३७; यजुवेंद्र चहल २/२७).