पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धा : बोपन्ना उपांत्यपूर्व फेरीत, शरण बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 03:14 AM2019-11-02T03:14:08+5:302019-11-02T03:14:23+5:30

दिविज शरणला दुसऱ्याच फेरीत बसला पराभवाचा धक्का

Paris Masters Tennis Tournament: Bopanna in the semifinal round, out of refuge | पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धा : बोपन्ना उपांत्यपूर्व फेरीत, शरण बाहेर

पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धा : बोपन्ना उपांत्यपूर्व फेरीत, शरण बाहेर

Next

पॅरिस : भारताचा दुहेरीतील आघाडीचा खेळाडू रोहण बोपन्ना याने जोडीदार डेनिस शापोवालोव याच्यासोबत पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसरीकडे दिविज शरण हा दुसºया फेरीत पराभूत होताच स्पर्धेबाहेर पडला.

बोपन्नाने कॅनडाच्या सहकाºयासोबत ५९ मिनिटात दुसºया फेरीच्या सामन्यात मॅन्युएल -गोन्साल्विस या अमेरिकन- अर्जेंटिनाच्या खेळाडूंवर ६-१, ६-३ ने विजय नोंदविला. या जोडीने चारवेळा प्रतिस्पर्धी खेळाडूंची सर्व्हिस भंग केली. शरण आणि न्यूझीलंडचा त्याचा साथीदार आर्टेम सिटाक यांना फॅब्रिस मार्टिन- जेरेमी चार्डी या फ्रान्सच्या जोडीकडून ५३ मिनिटात २-६, ३-६ ने पराभवाचा धक्का बसला. मार्टिन-चार्डी यांच्या वेगवान व चपळ खेळापुढे शरण-सिटाक यांना पुनरागमन करता आले नाही.

नदालचा वावरिंकाला धक्का
पुरुष एकेरीत स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने अपेक्षित विजयी आगेकूच करताना स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाचा ६-४, ६-४ असा पराभव केला. यासह नदालने वावरिंकाविरुद्धच्या आपला रेकॉर्ड १९-३ असा केला. उपांत्यपूर्व फेरीत नदाल जो विल्फ्रेड त्सोंगाविरुद्ध भिडेल.

त्सोंगाने जर्मनीच्या जॉन लेनार्ड याचा २-६, ६-४, ७-६ असा पराभव केला. अन्य लढतीत स्टेफानोस सिटसिपास याने अ‍ॅलेक्स डी मिनॉरचा ६-३, ६-४ असा पराभव केला असून तो उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल नोव्हाक जोकोविचविरुद्ध खेळेल. जोकोविचने ब्रिटनच्या काएल एडमंडला ७-६, ६-१ असे नमविले.

म्हणून बदलले जोडीदार
शरणने या मोसमात दोनदा जेतेपदाचा मान मिळविला आहे. बोपन्ना- शरण यांनी टोकियो आॅलिम्पिकच्या तयारीसाठी सुरुवातीला एकत्र येण्याची तयारी दर्शविली. तथापि काही वेळ सराव केल्यानंतर मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या जोडीला प्रवेश मिळविण्यात अडसर येत असल्याचे लक्षात येताच दोघेही वेगवेगळ्या जोडीदारांसोबत खेळत आहेत.

Web Title: Paris Masters Tennis Tournament: Bopanna in the semifinal round, out of refuge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस