शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पारधी वस्तीवर मिळू लागले अक्षरज्ञान शिक्षकांचा पुढाकार: पारंपरिक बदनामीतून बाहेर पडण्यासाठी धडपड

By admin | Updated: February 10, 2015 00:55 IST

हिसरे :

हिसरे :
पारधी समाजातील गुन्हेगारीला छेद देण्यासाठी याच समाजातील दोन शिक्षकांनी पुढाकार घेतला असून, हिसरे (ता. करमाळा) येथील हरी गोपीनाथ काळे व संतोष शंकर काळे यांनी आपल्याच वस्तीवर असलेल्या आबालवृद्धांसह बालकांना अक्षरज्ञान देत आहेत. याला नवयुवकांचीही साथ मिळत असल्याने ज्ञानदानाचा प्रकाश या वस्तीवर पडत आहे.
पारधी समाजाचे निघताच सगळ्यांच्या मनात वेगळाच विचार निर्माण होतो. माणसासारखीच माणसं, पण पूर्वजांनी केलेल्या कलंकित कामगिरीमुळे आजही हा समाज बदनाम होऊ पाहत आहे. याला छेद देण्याचे काम खडतर परिस्थितीतही जिद्द, चिकाटीच्या बळावर हरी गोपीनाथ काळे व संतोष शंकर काळे या दोघांनी शिक्षण घेतले. स्वत: शिक्षित झाले आणि नोकरीही लागली म्हणून त्यांनी समाजाला वार्‍यावर न सोडता या समाजाची कुळे उद्धारण्यासाठी या दोघा शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांना शिक्षित करण्याचा वसा घेतला आहे.
अक्षरज्ञान देण्यासाठी धडपडणार्‍या शिक्षकांना नवयुवक विद्यार्थी राधा काळे, राजाभाऊ काळे, माधुरी भोसले, दिलीप काळे, नेहा काळे, रवी भोसले, नाना काळे, राहुल काळे, महेंद्र काळे त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यात हातभार लावत आहेत. केवळ शिक्षणाचे धडे न देता या समाजाला आपल्या हक्कांची व अधिकारांचीही जाणीव करून देण्यात येत असल्याने आतापर्यंत गुन्हेगारीच्या बेड्यात अडकून राहिलेला हा समाज आज सुशिक्षित तर होतच आहे, त्याचबरोबर आपल्या हक्कांसाठी लढा द्यायची भाषा करीत आहे.
कोट:::::::::::::
समाजावरील गुन्हेगारीचा कलंक पुसला पाहिजे. समाजाची प्रगती झाली पाहिजे. ही भावना होतीच, पण हक्कांची आणि अधिकारांची जाणीव करून देणारे शिक्षण हे एक माध्यम आहे. या माध्यमातून वस्तीवरील समाजाला आम्ही अक्षरज्ञान देत आहोत. याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. ज्ञानदानाच्या या कामात नवयुवक व युवतीही सहभागी होत आहेत.
—हरी काळे, संतोष काळे
शिक्षक
कोट::::::::::::::::
हिसरे येथील पारधी समाजातील शिक्षकांनी सामाजिक सुधारण्याचा वसा घेतल्याने पारधी समाजाची असणारी भीती आणि गुन्हेगारी वृत्ती भविष्यात निश्चितच नाहीशी होईल. पारधी समाजातील या आगळ्या-वेगळ्या सामाजिक उपक्रमाचे आम्हाला कौतुक आणि अभिमान आहे.
-बिपीन हसबनीस
पोलीस निरीक्षक