शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाकचा आॅस्ट्रेलियावर सहा विकेटसनी विजय

By admin | Updated: January 16, 2017 05:20 IST

पाकिस्तानने रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा सहा गड्यांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

मेलबोर्न : मोहम्मद आमिरसह गोलंदाजांनी केलेला अचूक मारा व प्रभारी कर्णधार मोहम्मद हफीज व अनुभवी शोएब मलिकची जबाबदारीपूर्ण खेळी याच्या जोरावर पाकिस्तानने रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा सहा गड्यांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आमिरने ४७ धावांच्या मोबदल्यात तीन बळी घेतले, तर जुनेद खान व इमाद वसीम यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी परतविले. नाणेफेक जिंंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या आॅस्ट्रेलियाचा डाव ४८.२ षटकांत २२० धावांत संपुष्टात आला. आॅस्ट्रेलियातर्फे कर्णधार स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. नियमित कर्णधार अझहर अली दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाचे नेतृत्व करीत असलेल्या सलामीवीर हफीजने आपली भूमिका चोख बजाविताना १०४ चेंडूंमध्ये आठ चौकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली. त्याने शार्जिल खानसोबत (२९) सलामीला ६८ धावांची आणि बाबर आजमसोबत (३४) दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर अनुभवी मलिकने नाबाद ४२ धावांची खेळी करीत पाकिस्तानला ४७.४ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात २२१ धावांची मजल मारून दिली. मलिकने ५२ चेंडूंना सामोरे जाताना पाच चौकार व एक षट्कार लगावला. उमर अकमल १८ धावा काढून नाबाद होता. आॅस्ट्रेलियातर्फे मिशेल स्टार्क (२-४५) व जेम्स फॉकनर (२-३५) यांनी चांगली गोलंदाजी केली; पण संघाचा पराभव टाळण्यात त्यांना अपयश आले. (वृत्तसंस्था)