शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची बलाढ्य आफ्रिकेवर २९ धावांनी मात

By admin | Updated: March 7, 2015 14:31 IST

पाकिस्तानने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा २९ धावांनी पराभव करत वर्ल्डकपमधील आव्हान जीवंत ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत 

ऑकलंड, दि. ९ - पाकिस्तानने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा २९ धावांनी पराभव करत वर्ल्डकपमधील आव्हान जीवंत ठेवले आहे. पाकिस्तानच्या वेगवान मा-यासमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली. 
वर्ल्डकपमध्ये शनिवारी पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमने सामने होते. सुरुवातीचे दोन सामने गमावल्याने टीकेचे धनी ठरलेल्या पाकिस्तानसाठी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवणे आवश्यक होते. दक्षिण आफ्रिकेने सलग दोन सामन्यांमध्ये ४०० धावांचा डोंगर उभा करत पाकला धोक्याचा इशाराच दिला होता. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन वेळा पावसाचा व्यत्यय आल्याने सामना ४७ षटकांचा खेळवण्यात आला.  आफ्रिकेच्या मा-यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. कर्णधार मिसबाह उल हकच्या ५६ धावा आणि सलामीवीर सरफराझ अहमदच्या ४९ धावांच्या खेळीने पाकिस्तानने २०० चा टप्पा ओलांडला. पाकिस्तानचा डाव ४६.४ षटकांत २२२ धावांमध्ये आटोपला. डकवर्थ लुईस नियमासमोर आफ्रिकेसमोर विजयासाठी २३२ धावांचे लक्ष्य होते. आफ्रिकेच्या वतीने डेल स्टेनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. 
हाशिम आमला, फाफ डू प्लेसिस, रिली रोसोवू, जेपी ड्यूमिनी, एबी डिव्हिलियर्स असा दर्जेदार फलंदाजांचा समावेश असलेला आफ्रिकन संघ हे लक्ष्य सहज गाठेल असे दिसत होते. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत आफ्रिकेची भक्कम फलंदाजी भेदली. सलामीवीर क्विंटन डी कॉक भोपळा न फोडताच माघारी गेला. फाफ डू प्लेसिसही संघाच्या ६७ धावा झाल्या असताना तंबूत परतला. त्यापाठोपाठ हाशिम आमला ३३ धावांवर बाद झाला. आफ्रिकेने १० धावांमध्ये ४ विकेट गमावल्याने आफ्रिकेची अवस्था ५ बाद ७७ अशी झाली होती. कर्णधार एबी डिव्हिलियर्सने जेपी ड्यूमिनीच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण ड्यूमिनीही स्वस्तात बाद झाला. डिव्हिलियर्सने एकाकी झूंज देत ७७ धावा केल्या. त्याच्या अर्धशतकीय खेळीने आफ्रिकेला २०० धावा करता आल्या. डिव्हिलियर्स बाद झाल्यावर आफ्रिकेचा डाव ३३.३ षटकांत २०२ धावांवर आटोपला. पाकिस्तानचा विकेटकिपर सरफराझ अहमदने सहा झेल टिपून पाकिस्तानच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पाकिस्तानतर्फे मोहम्मद इरफान, राहत अली व वहाब रियाझ या त्रिकुटाने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. 
या विजयामुळे पाकिस्तान गुणतालिकेत तिस-या स्थानावर आला आहे. दबावाखाली खेळण्यात आफ्रिकेचा संघ अपयशी ठरतो हे या सामन्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.