शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचा सहभाग अधांतरी

By admin | Updated: October 9, 2016 04:53 IST

भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर लखनौ येथे डिसेंबरमध्ये आयोजित होणाऱ्या ज्युनिअर हॉकी विश्वचषकात पाकचा संघ सहभागी होणार

कराची : भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर लखनौ येथे डिसेंबरमध्ये आयोजित होणाऱ्या ज्युनिअर हॉकी विश्वचषकात पाकचा संघ सहभागी होणार किंवा नाही, याचा निर्णय सरकारच्या परवानगीवर विसंबून असल्याचे पाक हॉकी महासंघाचे महासचिव शाहबाज अहमद यांनी सांगितले.पाक हॉकी महासंघाने सरकारकडे पाक संघाच्या सहभागाविषयी परवानगी मागितली आहे. विनंतीवर अद्याप उत्तर आलेले नाही. सरकारकडून हिरवी झेंडी मिळताच आमचा संघ भारतात दाखल होईल, असे अहमद यांनी स्पष्ट केले. उभय देशांत सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही पाक स्पोर्ट्स बोर्डाकडे स्पर्धेत सहभागी होऊ देण्याची विनंती केली असली, तरी ज्युनिअर विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेस आमचे खेळाडू मुकतील, अशी भीती आहे. आम्हाला परवानगी मिळेलच, असे नाही. सरकारने ठरविले, तरच लखनौमध्ये दाखल होऊ. ऊरी हल्ल्यानंतर उभय देशांत राजकीय आणि सैनिकी वातावरण तापले आहे. अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या कबड्डी विश्वचषकात सहभागी होण्यास पाक कबड्डी संघाला नकार देण्यात आला. आमच्या सर्व आशा पाकिस्तान सरकारच्या भूमिकेवर विसंबून असल्याचे राष्ट्रीय हॉकी संघाचे माजी कर्णधार शाहबाज यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)