शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडविरुद्ध पेस खेळणार नाही

By admin | Updated: June 13, 2015 00:53 IST

पुढील महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या डेव्हिस चषक सामन्यातून दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने माघार घेतल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे

नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या डेव्हिस चषक सामन्यातून दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने माघार घेतल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. निवडकर्त्यांनी शुक्रवारी एकेरीचा स्टार खेळाडू सोमदेव देववर्मन आणि यूकी भांबरी यांचा समावेश असलेल्या चार खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर केला.गतवर्षी बंगळुरूयेथे झालेल्या जागतिक गटाच्या प्ले आॅफ सामन्यात सर्बियाविरुद्ध पेस खेळला होता. मात्र, त्या वेळी भारताला २-३ अशा पराभवास सामोरे जावे लागले होते. दरम्यान, पेसने माघार घेतल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध दुहेरी गटाची जबाबदारी रोहन बोपन्ना आणि साकेत माइनेनी यांच्यावर असेल. त्याच वेळी नवोदित गुणवान खेळाडू रामकुमार रामनाथन याचीदेखील राखीव खेळाडू म्हणून संघात वर्णी लागली आहे.निवड समिती अध्यक्ष एस. पी. मिश्रा यांनी पेसच्या माघारीबाबत सांगितले, की पेसने काही कारणास्तव न खेळण्याचा निर्णय घेतल्याने तो या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. ही एक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा असून, या आधी दोन खेळाडूंची राखीव खेळाडू म्हणून संघात निवड केली होती, असेही मिश्रा यांनी सांगितले.त्याच वेळी भारतीय प्रशिक्षक जीशान अली यांनी सांगितले, की पेसने माघार घेण्याबाबर नक्की कारण दिलेले नसले तरी, त्याने आगामी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी उपलब्ध असेल असे सांगितले आहे. दरम्यान, पेसच्या अनुपस्थितीत संघाची मोठी कसोटी लागेल, तरी संघ मजबूत आहे, असेही अली यांनी सांगितले. भारतने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध ७ सामने खेळले असून, त्यापैकी ४ सामन्यांत बाजी मारली आहे. (वृत्तसंस्था)