पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत

By Admin | Updated: January 24, 2016 02:18 IST2016-01-24T02:18:22+5:302016-01-24T02:18:22+5:30

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत या स्पर्धेत अग्रमानांकित असलेल्या कोरियाच्या जी ह्यूग सुंगला चुरशीच्या झालेल्या लढतीत पराभवाचा धक्का देत

P. V. Sindhu in final round | पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत

पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन

पेनांग (मलेशिया) : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत या स्पर्धेत अग्रमानांकित असलेल्या कोरियाच्या जी ह्यूग सुंगला चुरशीच्या झालेल्या लढतीत पराभवाचा धक्का देत मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
सिंधूने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कोरियाच्या ह्युग सुंगला एक तास ९ मिनिटे चाललेल्या लढतीत २१-१९, १२-२१, २१-१० असे नमविले. विश्व मानांकनात १२व्या क्रमांकावर असलेली सिंधू पाचवे ग्रांप्रीचे विजेतेपद जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडू एकमेकींविरुद्ध गुण घेण्यासाठी चांगलीच झुंज देत होत्या. एक वेळ अशी होती, की गुणसंख्या ११-११ अशी होती. त्यानंतर सिंधूने सलग सात गुण घेत ती गेम आपल्या नावावर केली. सिंधू दुसऱ्या गेममध्ये आपला पहिल्या गेममधील खेळाची लय राखता आली नाही. तिला दुसऱ्या गेममध्ये पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूने ह्युंगला नेटजवळ चांगलेच नाचविले. सिंधूने काही उत्कृष्ट प्लेसिंग करीत आक्रमक स्मॅशसुद्धा मारले. सुरुवातीला ३-३ अशी बरोबरी असताना सिंधूच्या खेळापुढे ह्युंगचा निभाव लागला नाही. सिंधूने तिसरी गेम जिंकत अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. (वृत्तसंस्था)

Web Title: P. V. Sindhu in final round