शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ९६ जागांवर घेतली आघाडी
2
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
3
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
4
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
5
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
6
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
7
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
8
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
9
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
10
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
11
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
12
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
13
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
14
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
15
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
16
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
17
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
18
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
19
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
20
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक बॉक्सर्सना आॅलिम्पिकची दारे खुली

By admin | Updated: June 2, 2016 02:09 IST

व्यावसायिक बॉक्सर्स आगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतील. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने बुधवारी हा निर्णय घेतला.

लुसाने : व्यावसायिक बॉक्सर्स आगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतील. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने बुधवारी हा निर्णय घेतला. स्वित्झर्लंडच्या लुसाने शहरात झालेल्या बॉक्सिंग काँग्रेसमध्ये ८८ सदस्यांनी याच्या बाजूने मतदान केले. विरुद्ध एकही मत पडले नाही; पण चार सदस्य तटस्थ राहिले. या निर्णयानंतरही दिग्गज बॉक्सर रिओमध्ये दिसण्याची शक्यता कमीच आहे. अनेक बॉक्सर पात्रता फेरीत खेळलेले नसल्याने त्यांना थेट प्रवेश मिळणार नाही. माजी हेविवेट चॅम्पियन ब्लादिमीर क्लिश्चको हा देखील पात्रता फेरी खेळला नव्हता. भारताचा स्टार विजेंदरसिंग याच्याकडे देखील पात्रता फेरी खेळण्याची संधी उपलब्ध नाही. माईक टायसन आणि लेनॉक्स लुईस यांनी हा निर्णय मूर्खपणा असल्याचे संबोधले, तर आमीर खान याने निर्णयाचे स्वागत केले. मिडलवेट गटात अव्वल स्थानावर असलेला विजेंदर मागच्या वर्षी व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये आला. तेव्हापासून तो अपराजित आहे. १६ जुलै रोजी त्याला दिल्लीत डब्ल्यूबीओ आशिया चषकासाठी लढत द्यायची आहे. अखेरची आॅलिम्पिक पात्रता स्पर्धा १६ जूनपासून अझरबैजान येथे होत आहे. त्यासाठी मागच्या महिन्यात चाचणी झाली तेव्हा विजेंदर स्पर्धक नव्हता. पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघदेखील आधीच निवडण्यात आला असल्याने विजेंदरची संधी हुकली आहे. (वृत्तसंस्था)