शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा कांस्यपदकावर समाधान

By admin | Updated: May 21, 2016 04:58 IST

चीनची भक्कम भिंत पार करण्यात अपयशी ठरल्याने भारताला उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा एकदा कांस्य पदकावर समाधान मानावे लागले

कुनशान : संभाव्य विजेत्या चीनची भक्कम भिंत पार करण्यात अपयशी ठरल्याने भारताला उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा एकदा कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि ज्वाला गुट्टा - एन. सिक्की रेड्डी या प्रमुख खेळाडूंना आपआपल्या लढतीत हार पत्करावी लागल्याने भारताला ०-३ असा दारुण पराभव पत्करावा लागला.भारताची अव्वल खेळाडू सायना आणि सिंधू अटीतटीच्या लढतीत पराभूत झाल्यानंतर ज्वाला - रेड्डी जोडीही पहिल्या दुहेरीत पराभूत झाल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टा आले. गतवर्षी दिल्लीत झालेल्या स्पर्धेत भारताने प्रथमच कांस्य पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र यंदा कामगिरी उंचावण्यात भारतीय संघाला यश आले नाही. थायलंडला ३-१ असे नमवून उपांत्य फेरी गाठल्यानंतर १३ वेळच्या विजेत्या चीनविरुध्द भारत अपयशी ठरला. सायना व सिंधू यांच्या कामगिरीवर भारताची वाटचाल प्रामुख्याने अवलंबून होती. मात्र दोघींनाही चुरशीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. तीन सेटपर्यंत रंगलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात सायनाला ली झुएरेईविरुध्द १५-२१, २१-१२, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे ली विरुध्द सायनाचा हा सलग आठवा पराभव ठरला. यानंतर झुंजार खेळ केलेल्या सिंधूला शिजियान वांगविरुध्द १२-२१, २१-२३ असा पराभव मान्य करावा लागला. तर, टियान क्विंग - झाओ युनलेई यांच्या आक्रमकतेपुढे ज्वाला - सिक्की यांचा ६-२१, ६-२१ असा फडशा पडला. (वृत्तसंस्था)एकेरीत सायनाने चांगली सुरुवात करताना १०-६ अशी आघाडी मिळवली. मात्र, लीने दमदार पुनरागमन करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्ये २-६ असे पिछाडीवर पडल्यानंतर सायनाने झुंजार खेळाच्या जोरावर ८-८ अशी बरोबरी साधून सलग ९ गुण मिळवताना सामना बरोबरीत आणला. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये मात्र १३-१३ अशी बरोबरी साधल्यानंतर चीनी खेळाडूने वेगवान खेळ करुन सामन्यावर कब्जा केला.दुसऱ्या एकेरीच्या पहिल्या सेटमध्ये सिंधूचा शिजियानविरुद्ध काहीच निभाव लागला नाही. मात्र दुसऱ्या सेटमध्ये १८-८ अशा मजबूत आघाडीवर असताना सिंधूकडून काही चूका झाल्या व त्याचा फायदा घेत शिजियानने २०-२० अशी बरोबरी साधून विजय मिळवला.