प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या हत्येचा प्रयत्न? अन्नातून दिले विष, जाणून घ्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:42 IST2025-01-10T15:41:45+5:302025-01-10T15:42:03+5:30

Novak Djokovic Tennis: सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने मोठा दावा केला आहे.

Novak Djokovic: Attempted assassination of famous tennis player Novak Djokovic? Poison given through food, know the case | प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या हत्येचा प्रयत्न? अन्नातून दिले विष, जाणून घ्या प्रकरण

प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या हत्येचा प्रयत्न? अन्नातून दिले विष, जाणून घ्या प्रकरण

Novak Djokovic Tennis: जगप्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 पूर्वी आपल्यावर विषप्रयोग झाल्याचा खुलासा स्वत जोकोविचने केला आहे. कोरोना काळात लसीकरण न केल्यामुळे जोकोविचचा व्हिसा रद्द झाला होता. यानंतर त्याला ताब्यातही घेण्यात आले होते. यादरम्यान, आपल्या जेवणात विष मिसळल्याचा दावा जोकोविचने केला.

जोकोविच यावर्षीच्या पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये भाग घेण्यासाठी गेला आहे. यावेळी त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जोकोविच म्हणाला की, मला मेलबर्नमधील हॉटेलमध्ये विषारी अन्न देण्यात आले. त्यामुळे माझी प्रकृती खालावली होती. मी सर्बियाला परतलो आणि चाचणी केली, त्यानंतर माझ्या शरीरात शिसे आणि पारा आढळून आला.

2022 मध्ये जोकोविचसोबत काय झाले ?

कोव्हिड 19 च्या नियमांमुळे जोकोविच 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले होते. यासोबतच त्याला चार दिवस हॉटेलमध्येही ठेवण्यात आले होते. हे एक डिटेन्शन सेंटर होते. यानंतर जोकोविचला परत पाठवण्यात आले. जोकोविचने कोरोनाची लागण झाल्याची माहिती लपवल्याचा दावाही करण्यात आला होता.

जोकोविचच्या नावावर अनेक विक्रम 
जोकोविचच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याने 24 पुरुष एकेरी ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. जोकोविच बऱ्याच काळापासून जगातील नंबर 1 खेळाडू आहे. तो सध्या एटीपी क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. जोकोविचने गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक पटकावले आहे.

Web Title: Novak Djokovic: Attempted assassination of famous tennis player Novak Djokovic? Poison given through food, know the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.